22 June, 2020

परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरु · अटी व शर्तीच्या अधीन राहून कामकाजास परवानगी


परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरु
·   अटी व शर्तीच्या अधीन राहून कामकाजास परवानगी

         हिंगोली,दि.22: राज्यातील सर्व परिवहन कार्यालयामध्ये असणारी सर्व कामे जसे अनुज्ञप्ती जारी करणे, शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करणे, अनुज्ञप्ती विषयक सर्व कामे इत्यादी कामकाज सुरु करण्याचे राज्य परिवहन आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.
            या कामासाठी आगाऊ वेळ निर्धारण प्रणाली (अपॉईंटमेंट) प्रणाली सुरु करुन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या संख्येनुसार प्रत्येक कामासाठी कोटा निश्चित करुन देण्यात आला आहे. येथील उप प्रादेशिक कार्यालयात येणाऱ्या सर्व अर्जदारांना अनुज्ञप्तीचे कामकाज करण्यासाठी खालील अटीचे पालन करावे लागणार आहे.
दोन अर्जदारामध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे. अर्जदाराने मास्क व हॅन्डग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश करावा. आगाऊ वेळ निर्धारण (अपॉईंटमेंट) असणाऱ्या अर्जदारानाच कार्यालयात प्रवेश दिला जाईल.
            कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील गर्दी कमी ठेवण्यासाठी शासनातर्फे वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****

No comments: