इजिमा-35
रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात
·
सार्वजनीक बांधकाम विभागाकडून खुलासा
हिंगोली,दि.29
: दैनिक सकाळ या वृत्तपत्रात दि. 27
जून, 2020 रोजी ‘पुल वाहून गेला 25 गावांचा वांधा, हिंगोली तालूक्यातील वसईतील
घटना मराठवाड्यात पाऊस’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द झाले आहे. तसेच यामध्ये ‘मृग
नक्षत्रातील पावसाने वसई येथील पुलाच्या बाजूची माती खचली होती. त्याकडे सार्वजीनक
बांधकाम विभागाने दूर्लक्ष केल्याचे म्हटले आहे’.
परंतू सदर रस्ता औंढा नागनाथ तालुक्यातील रस्ते विकास
आराखडा 2001-2021 नुसार इजिमा-35 दर्जाचा असून हा रस्ता प्ररामा-7 वर चिखलवाडी
-समगा-धामणी-वसई-पूर-कंजाळा-जामगव्हाण रामा 257 ला मिळणारा आहे. तसेच सदर इजिमा-35
हा रस्ता देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नसून कार्यकारी
अभियंता, जिल्हा परिषद (बांधकाम) हिंगोली यांच्या कार्यक्षेत्रात आहे. त्यामुळे वृत्तपत्रात
प्रसध्द बातमीत सदर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषद (बांधकाम)
हिंगोली यांच्याकडे असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.
****
No comments:
Post a Comment