15 November, 2018

दलीतवस्ती प्रारुप आराखडा जाहीर आराखड्याबाबत सूचना अथवा हरकती दि. 19 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन


दलीतवस्ती प्रारुप आराखडा जाहीर

·         आराखड्याबाबत सूचना अथवा हरकती दि. 19 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

        हिंगोली, दि.15: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा  विकास करणे योजना अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीची सन 2011 च्या जनगणनेतील लोकसंख्येची आकडेवारी तसेच वस्तीमध्ये असलेली प्रत्यक्ष लोकसंख्या लक्षात घेऊन ग्रामसभेने मंजूर केलेल्या ठरावाच्या आधारे सन 2018-19 ते 2022-23 या कालावधीचा जिल्हानिहाय बृहत आराखडा तयार  करण्याचे निर्देश समाजकल्याण आयुक्तांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने  मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील  ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने पारीत केलेल्या ठरावाच्या आधारे गटविकास अधिकारी यांनी दलित वस्त्यांची यादी व त्यांना सन 2013-14 ते 2017-18 या कालावधीत मंजूर केलेल्या अनुदानासह सन 2018-19 ते 2022-23 या कालावधी करीताचा बृहत आराखडा जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे  सादर केला आहे.
            हिंगोली जिल्ह्यातील एकूण 563 ग्रामपंचायती मधून एकूण 1 हजार 147 दलित वस्त्यांचा बृहत आराखडा घोषित करण्याकरिता प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, लातूर यांच्याकडे सादर करावयाचा आहे. तत्पुर्वी सदर बृहत आराखड्याचे जाहीर प्रगटन करुन आराखड्याची प्रत सर्व पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, हिंगोली  तसेच हिंगोली जिल्ह्याच्या व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर बृहत आराखड्याबाबत कोणाचीही काही सूचना अथवा हरकत असल्यास दि. 19 नोव्हेंबर, 2018 पर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत, विहित कालावधीनंतर आलेल्या सूचना किंवा हरकतीचा कोणत्याही प्रकारचा  विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी व सदरील बृहत आराखडा हा कायम करण्यात येईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****

No comments: