जिल्हा गोवर-रुबेला मुक्तीसाठी नागरिकांनी मोहिमेत सहभागी व्हावे
- रूचेश जयवंशी
· गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी
यांच्या हस्ते शुभारंभ
हिंगोली,दि.27: जिल्ह्यात आजपासून गोवर-रूबेला
लसीकरण मोहीमेचा शुभारंभ होत असून, नागरिकांनी आपल्या 9 ते 15 वयोगटातील बालकांना ही
लस देवून गोवर-रूबेला या गंभीर आजरापासून दूरू ठेवण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हावे
असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
येथील जिल्हा परिदेच्या शाळेत गोवर-रूबेला
लसीकरण मोहीमेच्या शुभारंभ कार्यक्रमात श्री. जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, जिल्हा परषिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार आदींची उपस्थिती होती.
पुढे श्री. जयवंशी म्हणालेक की,
गोवर अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे. जो मुख्यत: मुलांना होतो. गोवर आजारामुळे
देशात दरवर्षी सुमारे 50 हजार रूग्ण मृत्युमुखी पडतात. रुबेला या आजाराचा संसर्ग गरोदर
मातांना झाल्यास गर्भपात किंवा जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात. यात बहिरेपणा आणि हृद्यविकृती
होऊ शकते. त्यामुळे गोवर-रूबेला लस देण्यात येत आहे.
सन 2020 पर्यंत गोवर आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रणाचे
उद्दिष्टशासनाने ठरविले आहे. त्यानुसार आजपासून जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम
राबविण्यात येणार आहे. या मोहीमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील जवळपास 3 लाख
18 हजार 230 बालकांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास दिड महीना ही मोहीम शिक्षण
विभाग, महिला व बाल कल्याणच्या संयुक्त विद्यमानाने राबविली जाणार आहे. नागरिकांनी
ही आपल्या मुलांना गोवर-रुबेलाची लस देवून ही मोहिम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजी पवार यांनी केले. यावेळी
जिल्हा परिषदेचे सदस्य, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने
उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment