03 November, 2018

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांकरीता शासनामान्य सार्वजनिक ग्रंथालयाकडून प्रस्तावाची मागणी


राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांकरीता
 शासनामान्य सार्वजनिक ग्रंथालयाकडून प्रस्तावाची मागणी

        हिंगोली,दि.3: भारत सरकाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या असमान निधी योजने अंतर्गत राज्यातील शासनामान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहायाच्या विविध योजना राबविण्यात येतात. सन 2018-19 पासून प्रतिष्ठानकडून असमान निधी योजना सुधारीत  करण्यात आल्या आहेत. सदर असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार सन 2018-19 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in  या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुकांनी तो या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा .
            राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय  अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.inहे संकेतस्थळ पहावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा नमुना सुधारीत स्वरुपात असावा. अर्जामध्ये नमूद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेमधील परिपूर्ण प्रस्ताव चार प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 30 नोव्हेंबर, 2018 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन  ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.
****

No comments: