आजपासून ग्रंथजत्रेचे आयोजन
हिंगोली,दि.29: जिल्हा
ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत हिंगोली येथे ग्रंथ जत्रेचे आयोजन करण्यात येणार
आहे. जिल्ह्यातील वाचक प्रेमीना या निमित्त हस्तलिखित, दुर्मिळग्रंथ, दिवाळी
अंकासह इतर दर्जेदार ग्रंथ या ग्रंथ जत्रेत उपलब्ध होणार आहेत. सदर ग्रंथ जत्रेचे
आयोजन येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम येथे आजपासून करण्यात आले असून, मराठवाडा
साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, प्रमुख पाहुणे
प्रसिध्द समिक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, ग्रंथालय संचालय सु.हि. राठोड, राजा राममोहन
राय ग्रंथालय प्रतिष्ठानचे क्षेत्रिय अधिकारी अनंत वाघ, सहायक ग्रंथालय संचालक
सुनिल हुसे यांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी ग्रंथांचे
प्रदर्शन व विक्री देखील करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त वाचक
प्रेमींनी या ग्रंथजत्रेस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिलींद
सोनकांबळे यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment