20 November, 2018

महात्मा गांधी मागासवर्ग विकास महामंडळमार्फत विविध व्यवसायाचे प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा गांधी मागासवर्ग विकास महामंडळमार्फत
विविध व्यवसायाचे प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

        हिंगोली,दि. 20: अनुसुचित जाती व नवबौध्द समाजातील सुशिक्षित  बेरोजगार उमेदवारांना तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्याकरीता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत  विविध व्यवसायाचे  शासन मान्य संस्थेमार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये  टू व्हीलर  सर्विस सेंटर , मोबाईल  रिपेअर सर्विस सेंटर , ब्युटीपार्लर, फॅशन डिझायनिंग, डिप्लोमा इन जी.एस.टी, , रेफ्रीजरेशन एंड एअर कंडिशनर  रिपेअर, संगणक प्रशिक्षण , मोटार वायडिंग, फेब्रिकेटर, वेल्डींग , रिटेल मॅनेजमेंट, वाहनचालक  इत्यादी  व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी सन 2018-19 या वर्षाकरिता  महामंडळाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा  दाखला , रेशन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखल , आधारकार्ड  इत्यादी कागदपत्रे  विहित नमुन्यातील अर्जासोबत  फोटोसह जोडून महामंडळाचे  जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब  आंबेडकर सामाजिक न्याय  भवन रिसाला हिंगोली येथे दिनांक 28 नोव्हेंबर 2018 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक , महात्मा फुले  मागासवर्ग विकास महामंडळ यांनी केले आहे.
000000

No comments: