17 November, 2018

नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्य निवडणुक 2018 साठी अंतिम मतदार यादी होणार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द


नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्य
निवडणुक 2018 साठी अंतिम मतदार यादी  होणार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द

        हिंगोली, दि. 17: महाराष्ट्र शासन  महसूल व वन विभाग  मंत्रालय , मुंबई अधिसूचना  दिनांक 27 जून 2018 नुसार नांदेड शिख गुरुद्वारा  सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्यांना  निवडून देण्यासाठी मतदार क्षेत्र औंरगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, बीड,लातूर  हे संपूर्ण जिल्हे व चंद्रपूर  जिल्ह्यातील  राजुरा, कोरपना व जीवती हे तालुके (तत्कालीन हैद्राबाद निजाम संस्थांनाचा महाराष्ट्रातील भाग) येथील महाराष्ट्र विधानसभेसाठी दिनांक 1 जुलै 2018 या अर्हता दिनांकास अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादीतील समाविष्ठ  शिख धर्मीय मतदारांची यादी तयार करुन निवडणुक घेण्यासाठी निम्नस्वाक्षरीतांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांचे मतदार यादी कार्यक्रम  दिनांक 3 जुलै 2018 अन्वये अंतिम मतदार यादी दिनांक 3 नोव्हेंबर 2018  रोजी प्रसिध्द करण्यात येणार होती. पुर्वनियोजीत  मतदार यादी  कार्यक्रमानुसार  दिनांक 3 नोव्हेंबर 2018 रोजी अंतिम  मतदार यादीची प्रसिध्दी केल्यास दिनांक 6 ते 13 नोव्हेंबर 2018 या कालावधीतील  शिख धर्मीयांचा 310 वा गुरु ता गद्दी  समारोह  2018 संभाव्य निवडणुक  कार्यक्रमाच्या कालावधीत येणार आहे.  गुरु ता गद्दीच्या धार्मिक समारोहाच्या व्यस्त  कार्यक्रमामुळे  शिख बांधवांना  निवडणुक  कार्यक्रमाची पुरेशी प्रसिध्दी  होणार नाही , अशी  जिल्हाधिकारी , नांदेड यांची धारणा झाली आहे.
             निवडणुक  कार्यक्रमाची  व्यापक प्रमाणात प्रसिध्दी होऊन  निवडणुक  नि:पक्षपातीपणे, पारदर्शकपणे पार पडणे, यासाठी विषयांकित निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या तारखेत योग्य तो बदल करणे आवश्यक असल्यामुळे नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजुर अपचलनगर साहिब बोर्ड निवडणुक नियम 1963 चे नियम 11 अन्वये  नांदेड शिख  गुरुद्वारा  सचखंड श्री हजूर  अपचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्य  निवडणुक 2018 साठी अंतिम मतदार यादी दिनांक 3 नोव्हेंबर ऐवजी 22 नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. याबाबत सर्व संबंधितांनी  नोंद घ्यावी , असे जिल्हाधिकारी , नांदेड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
0000000

No comments: