शाळा महाविद्यालयांनी विभागीय मंडळ
कार्यालयास
शिक्षकांची यादी सादर करावी
हिंगोली,दि.14 : सन
2019 ते 2021 या शैक्षणिक वर्षासाठी परीक्षक, नियामक, प्राश्निक यांची ज्येष्ठता
यादी अद्ययावत करण्यासाठी सर्व
महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व मान्यता प्राप्त कनिष्ठ
महाविद्यालय व माध्यमिक शाळा औरंगाबाद विभाग यांच्याकडून विषयनिहाय शिक्षकांची यादी मागविण्यात येत आहे. ज्या कनिष्ठ
महाविद्यालय , माध्यमिक शाळांनी शिक्षकांची ज्येष्ठता यादी मंडळ कार्यालयात सादर
केलेली नाही त्यांनी त्वरीत शिक्षकांची
यादी मंडळ कार्यालयास सादर करावी. अन्यथा आपल्या कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक
शाळांचे मार्च 2019 परीक्षेचे आवेदन पत्राचे साहित्य स्विकारल्या जाणार नाही , असे
विभागीय सचिव, विभागीय मंडळ, औरंगाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले
आहे.
000000
No comments:
Post a Comment