01 November, 2018

जवाहर नवोदय विद्यालय निवड प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्जाची मागणी


जवाहर नवोदय विद्यालय निवड प्रवेशाकरीता
ऑनलाईन अर्जाची मागणी
            हिंगोली,दि.01: जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा2019 इयत्ता सहावी वर्गात प्रवेशाकरीता दिनांक 6 एप्रिल 2019 शनिवार रोजी सकाळी 11.15 वाजता हिंगोली जिल्ह्यातील ठरलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. करीता आवेदन पत्र ऑनलाईन भरण्यास दिनांक 23 ऑक्टोबर 2018 पासून सुरुवात झाली आहे . आवेदन पत्र ऑनलाईन भरण्याचा शेवटचा दिनांक 30 नोव्हेंबर 2018 आहे.
            यावर्षी  हे प्रवेश अर्ज संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीनेच भरले जाणार आहे. यासाठी कोणतीही फी राहणार नाही. पालक हे अर्ज कुठूनही अपलोड करु शकतात. त्याकरीता पुढील काही बाबी आवश्यक आहेत- विद्यार्थी व पालकाची सही विद्यार्थ्याचा फोटो,इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यातील  सर्टीफिकेट सदरहू सर्टीफिकेट हे विद्यालयाच्या  www.jnvhingoli.gov.in आणि www.navodaya.gov.in वर डाऊनलोड लिंक मध्ये उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज अपलोड करण्याचा कालावधी दिनांक 23 ऑक्टोबर ते 30 नाव्हेंबर 2018 हा आहे.
            परीक्षेचे हॉल तिकिट दिनांक 1 मार्च 2019 पासून डाऊनलोड  करता येतील . तसेच ही प्रवेश परीक्षा दिनांक 6 एप्रिल 2019 रोजी हिंगोली जिल्हयातील परीक्षा केंद्रावर राहील, असे प्राचार्य श्री. लक्ष्मणन यांनी आवाहन केले आहे.
******

No comments: