14 November, 2018

वृध्द कलावंतांनी बँक खात्याची माहिती सादर करण्याचे आवाहन


वृध्द कलावंतांनी बँक खात्याची माहिती सादर करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.14:सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय,औरंगाबाद येथील कार्यालयामार्फत वृध्द कलावंतांचे मानधन थेट त्यांच्या खात्यावर जमा केले जाते. काही वृध्द कलावंत लाभार्थ्यांचे बँकेचे  खाते क्रमांक किंवा शाखा क्रमांक चुकीचे असल्याने सदर लाभार्थ्यांचे मानधन  बँक खात्यावर ऑनलाईन जमा करण्यात अडचण येत आहे. सदरील मानधन लाभार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी सदर वृध्द कलावंताच्या बँक खात्याचा 12/18 अंकी खाते क्रमांक व बँकेच्या शाखेचा आयएफएस कोड अनिवार्य आहे. त्यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्याच्या पासबुक सत्यप्रत या कार्यालयाकडे किंवा या ईमेलवर कृपया तात्काळ पाठवण्यात यावी, असे आवाहन सहायक संचालक, विभागीय कार्यालय, औरंगाबाद यांनी केले आहे.
000000





No comments: