लघु
उद्योग घटकांना जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.27: उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन यांचे वतीने दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी
करणाऱ्या लघु उद्योग घटकांना प्रथम व द्वितीय पारितोषिक देऊन गौरविण्यात येते. यात
प्रथम पुरस्कारासाठी रु. 15 हजार रोख व गौरवचिन्ह तसेच द्वितीय पुरस्कारासाठी रु.
10 हजार रोख व गौरवचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सन 2017 व 2018 करीता जिल्हा
पुरस्कारासाठी हिंगोली जिल्ह्यातील पात्र लघु उद्योग घटकांकडून अर्ज मागविण्यात
येत आहेत. अर्ज करण्यासाठी खालील बाबींची पुर्तता करणे आवश्यक आहे.
उद्योग घटकाची जिल्हा
उद्योग केंद्र, कार्यालयाकडे स्थायी लघु उद्योग म्हणून तीन वर्षांपूर्वी म्हणजेच
2017 करीता दि. 1 जानेवारी, 2014 पूर्वी नोंदणी
झालेली असावी तसेच 2018 करीता दि. 1 जानेवारी, 2015 पूर्वीची नोंदणी झालेली
असावी. उद्योग घटक मागील दोन वर्षांपासून उत्पादनात असणे आवश्यक आहे. उद्योग घटक
कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. यापूर्वी ज्या उद्योग घटकांना राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळालेले नाहीत असेच उद्योग
घटक जिल्हा पुरस्कारासाठी पात्र ठरतील. विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीकरीता
जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. अर्ज
स्विकारण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर, 2018 आहे. सदर पुरस्काराकरीता वरील
बाबींची पुर्तता करणाऱ्या जिल्ह्यातील पात्र लघु उद्योग घटकांनी या पुरस्कारासाठी
अर्ज करावेत असे आवाहन यु. एस. पुरी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली
यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment