आजपासून ‘हिंगोली ग्रंथोत्सव-2018’ सुरुवात
‘हिंगोलीकरासाठी ग्रंथोत्सवात साहित्यिकांची मांदियाळी’
हिंगोली,दि.29: उच्च् व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोलीयांच्या मार्फत ‘हिंगोली
ग्रंथोत्सव-2018’ चे आयोजन करण्यात येणार आहे. ‘हिंगोली ग्रंथोत्सव-2018’ निमित्त
आज जिल्हा परिषद बहुविध प्रशाला ते हिंगोलीचे कल्याण मंडपम दरम्यान सकाळी 9.00
वाजता ग्रंथदिंडीचे आयेाजन करण्यात आले आहे. सदर ग्रंथ दिंडीत शालेय व
महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होणार असून जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात होणार आहे.
तसेच सकाळी 11.00 वाजता
कल्याण मंडपम, हिंगोली येथे ‘हिंगोली ग्रंथोत्सव-2018’ उद्घाटन कार्यक्रम होणार
आहे. या उद्घाटन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी तर उद्घाटक
म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले-पाटील आणि प्रमुख पाहुणे,
सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री हिंगोली जिल्हा दिलीप कांबळे आणि
प्रसिध्द समिक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तर
जि.प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, खासदार राजीव सातव, सर्वश्री आमदार रामराव वडकुते, विक्रम काळे, सतिश चव्हाण,
विप्लव बाजोरीया, डॉ. जयप्रकाश मुंदडा, तान्हाजी मुटकुळे, डॉ. संतोष टारफे
, नगर परिषदेचे अध्यक्ष बाबाराव
बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.
तुम्मोड, जिल्हा पोलीस अधिक्षक योगेशकुमार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास
पाटील, ग्रंथालय संचालक सु.ही. राठोड, आणि सहायक ग्रंथालय संचालक (औरंगाबाद विभाग)
सुनिल हुसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार
आहे.
आज दुपारी 2.30 वाजता कवी
संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यातप्रा. डॉ. संध्या रंगारी, रामचंद्र सावंत,
प्रा. नामदेव वाबळे, डॉ. जब्बार पटेल, बबन मोरे, सुभाष बगाटे, प्रा. राजा बनसकर,
कलानंद जाधव, शिलवंत वाढवे, मुरलीधर पंढरकर, शिवाजी घुगे, महारुद्र घेणेकर, रतन
आडे, राजकुमार नायक, आण्णा जगताप, सौ. सिंधुताई दहिफळे, प्रकाश परसावाळे, श्रीराम
कऱ्हाळे, प्रा. यु.एच. बलखंडे, महासेन प्रधान, शफी बोल्डेकर, धनंजय मुळे, प्रा.
मारोती कोल्हे आदीं उपस्थित राहून आपल्या कविता सादर करणार आहेत.
तसेच शनिवार दिनांक 1
डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 9.00 वाजता ‘अभिरुची संपन्नता व प्रभावी वाचन’ या
विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात प्रा. डॉ. विलास
डोईफोडे , शिवाजी पवार, प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव, प्रा. गोविंद भालेराव, नरेंद्र
नाईक, प्रा. डॉ. माधव जाधव, प्रा. महेश मंगनाळे हे सहभागीहोणार आहेत.
तसेच दि. 1 डिसेंबर, 2018
रोजी सकाळी 11.30 वाजता ‘महात्मा गांधी आणि वाचन संस्कृती’ या विषयावर
व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत ज्येष्ठ साहित्यिक अशोक
अर्धापूरकर आणि विजय वाकडे सहभागी होणार आहे.
याच दिवशी दुपारी 2.00
वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात बबन शिंदे, हर्षवर्धन परसवाळे,
विजय गुंडेकर, संगीता चौधरी, शिवाजी कऱ्हाळे,
सौ. कालिंदी वाघमारे, सुदाम खंदारे, गजानन भोयर, सौ. मीरा कदम, राज थळपते,
प्रद्युम्न गिरीकर, विजय ठाकरे, अनिकेत देशमुख, प्रकाश दांडेकर, डॉ. सौ. वंदना
काबरा, अभय भरतीया, मुरलीधर नगरकर, बबन दांडेकर, ज्ञानेश्वर लोंढे आणि चंद्रकांत
कावरखे आदीं आपल्या कविता सादर करणार आहेत.
जिल्ह्यातील
जास्तीत-जास्त वाचक प्रेमींनी ‘हिंगोली ग्रंथोत्सव-2018’ कार्यक्रमास उपस्थित
राहाण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिलींद सोनकांबळे यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment