15 November, 2018

नेहरु युवा केद्रात पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती साजरी





नेहरु युवा केद्रात पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती साजरी

        हिंगोली, दि.15: भारत सरकार युवक व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरु युवा केद्र हिंगोली येथे नेहरु युवा के्रद्र स्थापना दिवस व तसेच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु  यांची 129 वी जयंती उत्साहात साजरी केली गेली .
            पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पुजन सौरभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे ते म्हणाले की आजचा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. लहान मुलांचे चाचा नेहरु यांना इतिहास, राजकारण, साहित्य , संगीत यांच्याबदल जेवढं प्रेम होते त्यापेक्षा जास्त त्यांना मुलांबद्दल  आकर्षक  होत. मुलं ही पंडीतजींच्या ह्रदयातला एक अमुल्य ठेवा  होता. चळवळी आणि राजकारणाच्या धबडग्यात  ते रमायचे ते  फक्त बच्चे कंपनीमध्ये आणि मुलांनाही चाचा नेहरु आपलेसे  वाटायचे ते त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे  मुलांमध्ये रमताना  ते त्यांच्यातलेच एक होऊन जात . मुलांवरच्या याच त्यांच्या प्रेमामुळे ते सर्वांचे लाडके  चाचा नेहरु  झाले. त्यामुळेच 14 नोव्हेंबर हा पंडितजींचा जन्म दिवस बालदिन  म्हणून साजरा होऊ लागला. मुलं ही देशाचे भविय आहेत. त्यामुळे लहान वयात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं  तरच ते आदर्श नागरिक होऊ शकतील. याच उद्देशानं पंडितजींनी पंतप्रधान झाल्यावर लहान मुलांसाठी  अनेक योजना तयार  केल्या आहेत. त्यांना गुलाबाचे फुल सर्वात जासत आवडत होते. तसेच या कार्यक्रमास सह्याद्री बहुउद्देशीय  सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालाजी नरवाडे, हनुमान बोचरे, मिलिंद जाधव, नामदेव सपाटे, कृष्णा पक्वाने आदींची उपस्थिती लाभली.
****

No comments: