26 November, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामूहिक वाचन






जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामूहिक वाचन
            हिंगोली, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमत्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. शासनाच्या सूचनेनुसार आज जिल्हाधिकारी सभागृहामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.
            यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल कळसकर,  कौशल्य विकासच्या सहायक संचालक रेणुका तम्मलवार, सांख्यिकी अधिकारी श्रीराम पारवेकर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची  उपस्थिती होती.
00000

No comments: