03 November, 2018

इसापूर धरणातून पाणी पाळ्याचा प्रस्तावित कार्यक्रम


इसापूर धरणातून पाणी पाळ्याचा प्रस्तावित कार्यक्रम

हिंगोली,दि.3 : इसापूर धरणात दि. 15 ऑक्टोबर, 2018 रोजी धरणात 635.65 द.ल.घ.मी. (65.93 टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, उर्ध्व पेनगंगा प्रकल्पातंर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवाच्या लाख क्षेत्रातील लाभधारकांना व इसापूर धरण जलाशय, नदी, नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन  योजना धारकांना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार बिगर सिंचन आरक्षण व इतर व्यय वजा जाता रब्बी हंगामात  3 पाणी पाळ्या व उन्हाळी  हंगामात 4 पाणी  पाळ्या  देण्याचे प्रस्तावित आहे.
उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाअंतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण  व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचालनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. पाणी पाळ्या चालू होण्याचा संभाव्य दिनांक खालीलप्रमाणे असून, पाऊस, कालवा फुटी किंवा इतर अपरिाहार्य  कारणांमुळे या वेळापत्रकात बदल करण्यात येईल.
अ.क्र.
हंगाम
पाणीपाळी क्र.
इसापूर उजवा कालवा
इसापूर डावा कालवा

1

रब्बी हंगाम
1
5 नोव्हेंबर,2018
5 नोव्हेंबर, 2018
2
20 डिसेंबर, 2018
20 डिसेंबर, 2018
3
1 फेब्रुवारी, 2019
1 फेब्रुवारी, 2019

2

उन्हाळी हंगाम
4
1 मार्च, 2019
1 मार्च, 2019
5
1 एप्रिल, 2019
1 एप्रिल, 2019
6
1 मे, 2019
1 मे, 2019
7
1 जून, 2019
1 जून, 2019

वरील आवर्तनासाठी जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्व अटी व शर्ती लाभधारकांना बंधनकारक राहील, असे कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी कळविले आहे.
****

No comments: