खाजगी टँकरव्दारे पिण्याच्या पाणी पुरवठा
करण्याच्या ई-निविदेस द्वितीय मुदतवाढ
हिंगोली,दि.29: जिल्ह्यातील ग्रामीण/नागरी भागातील
टंचाईग्रस्त गावे,वाड्या,तांड्यांना पिण्याचे पाणी टँकरव्दारे पुरवठा करण्याबाबत दि.
1 नोव्हेंबर, 2018 रोजी ई-निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. सदर निविदा सूचनेमध्ये
देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ई-निविदेमध्ये प्रतिसाद न मिळाल्यामुळे सदर ई-निविदा
सादर करण्यासाठी दि. 5 डिसेंबर, 2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत द्वितीय मुदतवाढ
देण्यात आली आहे. ही निविदा दिनांक 6 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 03.05 वाजता उघडण्यात
येईल.
सदर ई-निविदा http://mahatenders.gov.in व www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध
आहे. तरी इच्छूक कंत्राटदारांनी सदर ई-निविदा प्रक्रियेत सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी
या कार्यालयाचे दुरवध्वनी क्रमांक 02456-221450 यावर संपर्क साधण्याचे आवाहन निवासी
उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांनी शुध्दीपत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment