अग्निपथ योजनेअंतर्गत 13 ऑगस्ट
ते 8 सप्टेंबर या कालावधीत
औंरगाबाद येथे सैन्य भरती मेळावा
हिंगोली, (जिमाका) दि. 18 : अग्निपथ योजनेंतर्गत
दि. 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर, 2022 या कालावधीत औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या स्टेडियमवर औरंगाबाद, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड,
परभणी या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतच्या अटी व
शर्ती, अधिसूचना केंद्र शासनाच्या www.joinindianarmy.nic.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर
जाऊन अग्नीवीर जनरल ड्यूटी, अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लार्क/स्टोअर कीपर टेक्निकल,
अग्नीवीर ट्रेडसमॅन दहावी पास व अग्नीवीर ट्रेडसमॅन 8 वी पास या पदासाठी दि. 30 जुलै,
2022 पर्यंत नोंदणी करावी.
वरील संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारानाच
सैन्य भरती मेळाव्यासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळावरुन
आपले ॲडमिट कार्ड काढून सोबत आणणे आवश्यक आहे. हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी
ऑनलाईन नोंदणी करुन सैन्य भरती मेळाव्यास उपस्थित राहावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी
तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment