12 July, 2022

 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तूर्त स्थगित

 

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 12 : अतिवृष्टीमुळे होणारी नैसर्गिक आपत्ती  पाहता राज्‍य निवडणूक आयोगाने जिल्‍हा परिषद व पंचायत समित्‍यांच्‍या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तसेच मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम तूर्त स्‍थगित केला आहे. याबाबतचा सुधारित आरक्षण सोडतीचा कार्यक्रम यथावकाश देण्‍यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.

राज्‍य निवडणूक आयोगाच्‍या कार्यक्रमानुसार हिंगोली जिल्‍हा परिषदेच्या सदस्‍यपदासाठी आरक्षणाची सोडत 13 जुलै रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात  जिल्‍हाधिकारी यांच्या अध्‍यक्षतेखाली  काढण्‍यात येणार होती. तसेच सर्व तालुका मुख्‍यालयी संबधित पंचायत समिती सदस्‍यांच्‍या आरक्षणाची सोडत संबधित तहसीलदार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी यांच्‍या नियंत्रणात 13 जुलै, 2022 रोजी सकाळी 11 वा. काढण्‍यात येणार होती. या आरक्षण सोडतीचा व मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम तूर्त स्‍थगित केला आहे.

****** 

No comments: