‘‘हर घर झेंडा’’
मोहिमेनिमित्त झेंडा खरेदीसाठी
संकतेस्थळावर दिलेल्या
लिंकवर मागणी नोंदवावी
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे
आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 06 : ‘‘आजादी का अमृत महोत्सव" अर्थात
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. 11 ऑगस्ट ते दि. 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार "हर घर झेंडा’’ हा उपक्रम राबविण्याच्या अनुषंगाने
सर्व शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक
संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर व नागरिकांनी स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी
स्वयंस्फूतीने करण्यासाठी सकारात्मक प्रभावी प्रसिद्धी मोहिम राबविण्यात यावी, अशा
सूचना शासनाने दिल्या आहेत.
त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातही
‘‘हर घर झेंडा’’ मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था,
शैक्षणिक संस्था, बँका यांनी त्यांच्या इमारतींवर
व नागरिकांनी स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी करावयाची असल्याने झेंडा खरेदीसाठी
आपली मागणी नोंदविण्यासाठी https://hingoli.nic.in/harghartiranga या
संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली
आहे.
वरील दिलेल्या लिंकवर जाऊन सर्व शासकीय
कार्यालय, निमशासकीय कार्यालय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी
स्वतः झेंडा खरेदीसाठी आपली मागणी नोंदवावी,
असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment