गटई कामगारांनी पत्र्याच्या स्टॉलसाठी 20 जुलैपर्यंत अर्ज करावेत
हिंगोली
(जिमाका), दि. 13 : जिल्ह्यातील गटई
कामगारांना उन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे, त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवन
उंचवावे यासाठी संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (Lidcom) व सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने पत्र्याचे स्टॉल देण्याची
योजना कार्यान्वित आहे.
सन 2022-23 या आर्थिक
वर्षासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, जातीचे
प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवाशी दाखला आणि या योजनेचा लाभ घेतला
नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र आदी कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
कार्यालय, हिंगोली यांच्याकडे दि. 20 जुलै, 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत. तसेच
यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करु नयेत, असे
आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment