19 July, 2022

 

दिव्यांगाना मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन

31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 19 : महाराष्ट्र शासन दिव्याग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गाना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंड, मुंबईची शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील एफआयसीसीआय ॲवार्ड-1999 प्राप्त झालेला आहे. सन 2022-23 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. माफक जागा असल्याने त्वरीत संपर्क साधावा. प्रवेशा साठी नियम अटी व सवलती.

            सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस (संगणक कोर्स) या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता किमान आठवी पास असणे आवश्यक आहे. तसेच मोटार अॅन्ड आमेंचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रीक कोर्स) या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता किमान नववी पास असणे आवश्यक आहे. या दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष आहे. तर या अभ्यासक्रमासाठी वयोर्यादा 16 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणासाठी फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो.

या वसतिगृहात प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टिकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना आदी सोयी व सवलती देण्यात येणार आहेत.

प्रवेश अर्ज व माहिती पत्रक अधीक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळीरोड, म्हेत्रेमळा, गोदड मळ्या जवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली पिन कोड:- 416410  दूरध्वनी क्रमांक 0233-2222908, भ्रमणध्वनी क्र. 9922577561 / 9975375557 या पत्यावर पोस्टाव्दारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेशअर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे दि. 31 जुलै 2022 पूर्वी पोहचतील अशा बेताने पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समितीव्दारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल.

माफक जागा असल्याने गरजू दिव्यांगानी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधावा. तसेच ग्रामीण व शहरी भागातील लोकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास ज्ञात असलेल्या गरजू अपंग बांधवाना याची माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक, शासकीय प्रौढ अंपग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज जि. सांगली यांनी केले आहे.

******

No comments: