डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास
14 जुलै पर्यंत मुदतवाढ
हिंगोली, (जिमाका) दि. 08 : डी.एल.एड. प्रथम
वर्ष सन 2022-23 या वर्षासाठी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज सादर करण्यासाठी 7 जुलै,
2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
राज्य शैक्षणिक संशोधन
व प्रशिक्षण परिषदेस राज्यातील विविध अध्यापक विद्यालयाकडून प्राप्त निवेदनानुसार ऑनलाईन
प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी दि. 14 जुलै, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment