07 July, 2022

 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी

शेतकऱ्यांनी  31 जुलै पर्यंत अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 : राज्यात खरीप-2022 हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यासाठी क्लस्टरनिहाय विमा कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय-लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. माणिकचंद आयकॉन, 3 रा मजला, प्लॉट नं.246, सी-विंग, बंड गार्डन, पुणे-411001, टोल फ्री क्रमांक-18001037712, जिल्हा प्रतिनिधी : साईप्रसाद उल्हारे मो. क्र. 7350413173, ई-मेल : customersupportba@icicilombard.com  या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे.

खरीप हंगामात खरीप ज्वारी, तूर, मूग, उडीद, कापूस व सोयाबीन या पिकांना विमा संरक्षण उपलब्ध आहे. यामध्ये खरीप ज्वारीसाठी संरक्षित रक्कम 30 हजार रुपये असून शेतकऱ्यांने भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम 600 रुपये आहे. सोयाबीन या पिकासाठी संरक्षित रक्कम 55 हजार रुपये असून शेतकऱ्यांने भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम 1100 रुपये आहे. मूग या पिकासाठी संरक्षित रक्कम 22 हजार रुपये असून शेतकऱ्यांने भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम 440 रुपये आहे. उडीद या पिकासाठी संरक्षित रक्कम 22 हजार रुपये असून शेतकऱ्यांने भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम 440 रुपये आहे. तूर या पिकासाठी संरक्षित रक्कम 36 हजार 802 रुपये असून शेतकऱ्यांने भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम 736.04 रुपये आहे. कापूस या पिकासाठी संरक्षित रक्कम 55 हजार रुपये असून शेतकऱ्यांने भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम 2750 रुपये आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हवामानातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, दुष्काळ, पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट आणि चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्ती या बाबींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची विमा कवच मिळणार आहे. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान इत्यादी बाबींचा सुध्दा समावेश आहे. पीक विमा हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल (pmfby.gov.in) सुरु करण्यात आले आहे.  हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  दि. 31 जुलै, 2022 पर्यंत मोठ्या प्रमाणात अर्ज करुन पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

*******

No comments: