आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना
पथकरातून सवलत मिळण्यासाठी
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात
पासची सुविधा
हिंगोली, (जिमाका) दि. 08 : आषाढी वारीमधील 10 मानाच्या पालख्या
ज्या मार्गावरुन जातात त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य
रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे पथकर स्थानकांवर मानाच्या
पालख्यांना व वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना दि. 7 जुलै ते 15 जुलै, 2022 या कालावधीत
पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी पथकरात सूट देण्याबाबत
निर्देश प्राप्त झाले आहेत.
हिंगोली
जिल्ह्यातील आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना पथकरातून
सवलत प्राप्त करण्यासाठी येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत स्वतंत्र कक्ष
स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत हिंगोली जिल्ह्यातील आषाढी वारीसाठी जाणाऱ्या
सर्व नागरिकांसाठी पथकरातून सवलत देण्यासाठी लागणारा पास कार्यालयीन वेळेत तसेच शनिवार
व रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशीही उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
हिंगोली
जिल्ह्यातील नागरिकांनी या पासेस प्राप्त करण्यासाठी येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी
संपर्क करावा, असे आवाहन अनंता जोशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment