इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनेचा
लाभ घ्यावा
हिंगोली (जिमाका), दि. 26 : महाराष्ट्र राज्य इतर
मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण
कल्याणासाठी स्वयंम उद्योगासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. तसेच इतर
मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व कुशल व्यवसाईक व्यक्तीना कृषी सलग्न व पारंपारिक
उपक्रम व लघु उद्योग व मध्यम उद्योग उत्पादन, व्यापार विक्री सेवाक्षेत्र इत्यादी
व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.
या महामंडळाकडून हिंगोली जिल्ह्यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मुख्यालय स्तरावरुन
एक लाख रुपयापर्यंतच्या थेट कर्ज योजनेसाठी 100 चे, 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजनेसाठी 47,
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी 119, गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी 13 व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी
11 चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्याचा योजनानिहाय
तपशील पुढीलप्रमाणे आहे.
एक लाख रुपयापर्यंतच्या थेट कर्ज योजनेसाठी 100 चे उदिदष्ट प्राप्त
झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर किमान 500
पेक्षा जास्त असावा, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी
असावे, परतफेडीचा कालावधी 48 समान मासिक हत्यांमध्ये राहील. नियमित परतफेड
करणाऱ्या लाभार्थ्याना या योजनेत व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकित झालेल्या
हप्त्यांवर दर साल दर शेकडा 4 टक्के व्याजदर आकरण्यात येणार आहे.
20 टक्के बीज भांडवल कर्ज योजनेसाठी 47 चे उदि्दष्ट प्राप्त झाले
आहे. या योजनेमध्ये 75 टक्के रक्कम ही बँकेची असून त्यावरील व्याज हे बँकेच्या
नियमाप्रमाणे राहील. 20 टक्के रक्कम ही महामंडळची असून त्यावर दर साल दर शेकडा 6
टक्के व्याज आकारण्यात येते व यामध्ये लाभार्थ्याचा
सहभाग 5 टक्के आहे. या योजनेची कर्ज मर्यादा 5 लाख रुपयापर्यंत असून परतफेडीचा
कालावधी पाच वर्षाचा समान 60 हप्त्याचा आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी 119 चे उदिदष्ट प्राप्त झाले
आहे. ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 10 लाख रुपये पर्यतची
आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य
आहे. या योजनेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयाच्या मर्यादेत आहे. कर्ज
परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास
व्याजाची रक्कम 12 टक्केच्या मर्यादेत व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक
प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा
करण्यात येईल. तसेच लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन
फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.
गट
कर्ज व्याज परतावा योजनेसाठी 13 चे उदिदष्ट प्राप्त झाले आहे. ही योजना बँकेमार्फत
राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 10 लक्ष ते 50 लक्ष रुपयापर्यतची आहे. या योजनेत
महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. गटातील लाभार्थीचे
वय 18 ते 45 वर्षे असावे. तसेच गटातील लाभार्थ्यांनी यापूर्वी महामंडळाचा किंवा इतर
कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच इतर मागास प्रवर्गातील महामंडळाच्या
निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट. भागीदार
संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण
प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीसाठी जे कर्ज दिले जाईल. त्या
कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी
11 चे उदिदष्ट प्राप्त झाले आहे. ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज रक्कमेवरील
व्याज परतावा देशांतर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी कर्ज मर्यादा 10 लक्ष ते 20 लक्ष
रुपये पर्यंतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी
अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे वय 17 वे 30 वर्षे असावे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक
उत्पन्न 8 लक्ष रुपयाच्या मर्यादेत असावे. विद्यार्थी 12 वीमध्ये 60 टक्के गुणासह उत्तीर्ण
असावा. रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.
ही कर्ज योजना ही बँकेमार्फत असून
लाभार्थ्याने महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत.
तसेच या योजनेचा लाभ हा इतर मागासवर्गीय समाजातील जास्तीत जास्त व्यक्तीने घ्यावा.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.
जिल्हा कार्यालय : डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसालाबाजार, हिंगोली-413513,
दूरध्वनी क्र. 02456-224465, ई-मेल dmobcparbhani@gmail.com
वर संपर्क साधावा, असे आवाहन एस. एन. झुंजारे जिल्हा व्यवस्थापक, हिंगोली यांनी केले
आहे.
**********
No comments:
Post a Comment