जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना स्थगिती
हिंगोली (जिमाका), दि. 05 : जिल्हा
नियोजन समितीच्या नवीन नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांसह जिल्हा नियोजन समित्यांचेही
पुनर्गठन होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन
2022-23 अंतर्गत दि. 1 एप्रिल, 2022 पासून आजतागायत विविध योजनांतर्गत कामांना देण्यात
आलेल्या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती देण्यात आली आहे. याची सर्व यंत्रणांनी नोंद
घ्यावी, असे आवाहन जिल्हा नियोजन विभागाने केले आहे.
*******
No comments:
Post a Comment