हिंगोली येथे जागतिक युवा कौशल्य
दिवस उत्साहात साजरा
हिंगोली, (जिमाका) दि. 18 : स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, हिंगोली आणि उर्मिला
हॉस्पिटल, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 15 जुलै, 2022 रोजी जागतिक युवा कौशल्य
दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
जागतिक युवा कौशल्य
दिनाचे औचित्य साधून उर्मिला हॉस्पिटल, कारवाडी, हिंगोली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात
आली.
यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त
डॉ. रा. म. कोल्हे यांनी प्रशिक्षणार्थींना वैद्यकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या भविष्यकालीन
संधी आणि कौशल्य विकास अंतर्गत घेतलेल्या प्रशिक्षणाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांच्या
हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी उर्मिला हॉस्पिटलचे संचालक डॉ.दिलीप
मस्के, डॉ.अच्यूत पतंगे, केंद्र संचालक रोकडेश्वर पतंगे, आनंद टाले, जिल्हा कौशल्य
विकास समन्वयक महेश राऊत, हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती
होती.
*****
No comments:
Post a Comment