15 July, 2022

 

डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास

21 जुलै पर्यंत मुदतवाढ

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 15 : डी.एल.एड. प्रथम वर्ष सन 2022-23 या वर्षासाठी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज सादर करण्यासाठी 14 जुलै, 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती.

            तथापि, आपत्कालीन पूर परिस्थितीचा विचार करता ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी          दि. 21 जुलै, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

No comments: