पेनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा
हिंगोली (जिमाका), दि. 28 : उर्ध्व
पेनगंगा प्रकल्प ईसापूर धरण सद्यस्थितीत 91 टक्के भरला असून नदीत 1295 क्यूसेक्स
विसर्गाने पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे पेनगंगा नदीपात्रात पाणी सोडल्यास
पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे नदी काठच्या गावाना सतर्कतेचा व सावधानतेचा
इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठावरील, पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील
नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी
यांनी केले आहे.
तसेच कोणीही नदी पात्रात जाणार नाही याची दक्षता
घ्यावी. यासाठी संबंधित गावांमध्ये दवंडी तसेच महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा
इत्यादी माध्यमाद्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, अशा सूचना तहसीलदार कळमनुरी
यांना दिलेल्या आहेत.
*******
No comments:
Post a Comment