वसमत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे
14 हजार 908 हेक्टर क्षेत्र बाधित
* 162 जनावरे, पडझड झालेली घरे 163, नुकसान झालेल्या
घरांची संख्या 1196 असल्याचा प्राथमिक अंदाज
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची माहिती
हिंगोली,दि .10 (जिमाका)
: हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये
दि. 8 जुलै, 2022 रोजी मध्यरात्रीनंतर कुरुंदा, गिरगाव, आंबा, बाभूळगाव या महसूल मंडळामध्ये
अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे घरामध्ये पुराचे
पाणी शिरुन काही घरांची पडझड झाली असून घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात
नुकसान झालेले आहे. अचानक झालेल्या अतिवृष्टी व त्यामुळे आलेल्या पुरामुळे जनावरे वाहून
गेले असून मोठ्या प्रमाणात जनावरांची जिवित हानी झालेली आहे.
याबाबत झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज पुढीलप्रमाणे
आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, बाभूळगाव, आंबा, हयातनगर या महसूल मंडळात
19 हजार 197 शेतकऱ्यांचे 14 हजार 908 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यात 162 जनावरे
दगावल्याचा अंदाज आहे. यामध्ये पडझड झालेली घरे 163 असून पुराचे पाणी घरात शिरुन नुकसान
झालेल्या घरांची संख्या 1196 आहे.
यामध्ये कुरुंदा या महसूल मंडळातील 6840 शेतकऱ्यांचे
5332 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जनावरांची संख्या 93, पडझड झालेली घरे 140 आणि
पुराचे पाणी शिरुन नुकसान झालेल्या घरांची संख्या 1135 आहे. गिरगाव महसूल मंडळातील
8132 शेतकऱ्यांचे 6487 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जनावरांची संख्या 69, पडझड झालेली
घरे 18 आणि पुराचे पाणी शिरुन नुकसान झालेल्या घरांची संख्या 61 आहे. बाभूळगाव महसूल
मंडळातील 3495 शेतकऱ्यांचे 2465 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पडझड झालेल्या घरांची
संख्या 02 आहे. आंबा महसूल मंडळातील 705 शेतकऱ्यांचे 604 हेक्टर क्षेत्र बाधित झाले
आहे. हयातनगर महसूल मंडळातील 25 शेतकऱ्यांचे 20 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पडझड
झालेल्या घरांची संख्या 03 आहे. या नुकसानीचा अंदाज हा प्राथमिक असून यामध्ये वाढ किंवा
घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment