विमा सल्लागार भरतीसाठी 22 जुलै रोजी थेट मुलाखतीचे आयोजन
हिंगोली
(जिमाका), दि. 13 : परभणी डाक विभागाकडून डाक
जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेअंतर्गत डायरेक्ट एजंट
(विमा सल्लागार) च्या भरतीसाठी दि. 22 जुलै, 2022 रोजी सकाळी 9.30 ते सायं.6.00 या
वेळेत अधीक्षक, डाकघर, परभणी विभाग, परभणी येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत.
यासाठी सर्व इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरुन अधीक्षक डाकघर, परभणी
विभाग, परभणी येथे थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावेत, असे आवाहन अधीक्षक डाकघर,
परभणी विभाग, परभणी यांनी केले आहे.
हे
अर्ज डाकघर अधीक्षक कार्यालय, परभणी विभाग, परभणी येथे उपलब्ध आहेत. हे अर्ज
परिपूर्ण भरुन मुलाखतीसाठी येताना बायोडाटा, मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्र, अनुभव
प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे. या पदासाठी पात्रता व मापदंड पुढीलप्रमाणे आहेत.
मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व
जास्तीत जास्त 50 वर्षे दरम्यान असावे. अर्जदार हा दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष
परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. त्याला केंद्रीय, राज्य मान्यता प्राप्त असणे
आवश्यक आहे. बेरोजगार, स्वयं बेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा
कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते,
महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्रामपंचायत सदस्य आदींनी टपाल जीवन
विमासाठी थेट अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार असून
व्यावसायिक कौशल्य, व्यक्तीमत्व, जीवन विमाबाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक
भागाची माहिती असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारास पाच हजार रुपयांची अनामत
रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी/केव्हीपीच्या स्वरुपात असेल.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून
तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो आयआरडीएची परवाना परीक्षा
पास केल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवानामध्ये रुपांतरीत केले जाईल. ही परीक्षा तीन
वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि
कमिशन तत्वावर राहील, असे अधीक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी यांनी
कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment