शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपन्याना द्यावी
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 15 : शेतकऱ्यांनी खरीप
हंगाम-2022 मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीअंतर्गत पीक नुकसानीची
पूर्वसूचना विमा कंपन्यांना द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
केले आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 14 जुलै, 2022 रोजी कृषि विभागाची आढावा बैठक
घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत
सुर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा कृषि विकास अधिकारी
निलेश कानडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशीकांत सांवत, विमा कंपनीचे जिल्हा
प्रतिनिधी साईप्रसाद उल्हारे, सर्व तालुका कृषि अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, जिल्ह्यात आयसीआयसीआय
लोंबार्ड जनरल इन्शूरंस कंपनी जि.पुणे यांच्यामार्फत खरीप हंगाम 2022 मध्ये प्रधान
मंत्री पीक विमा राबविली जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक
नैसर्गिक आपत्ती या जोखिमेच्या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित
क्षेत्र जलमय झाल्यास , ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या
आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळते. या महिन्यात जिल्ह्यातील काही
भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती
निर्माण झाल्यामुळे पिक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान झाल्याचे
निदर्शनास येत आहे. त्यामुळे सर्व तालुका कृषि अधिकारी यांनी कृषि सहायकामार्फत
शेतकऱ्यांना माहिती द्यावी व तात्काळ सर्व्हे सुरु करावा, अशा सूचना त्यांनी
यावेळी दिल्या.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या
शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72
तासांच्या आत क्रॉप इंन्शूरंस ॲपवर, संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँक,
कृषि व महसूल विभाग यांना कळवावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त
क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज
घोरपडे यांनी सांगितले.
याबाबत अधिक तपशीलासाठी आयसीआयसीआय-लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. माणिकचंद आयकॉन, 3 रा
मजला, प्लॉट नं.246, सी-विंग, बंड गार्डन, पुणे-411001, टोल फ्री क्रमांक-18001037712,
जिल्हा प्रतिनिधी : साईप्रसाद उल्हारे मो. क्र. 7350413173, ई-मेल : customersupportba@icicilombard.com या पत्यावर किंवा नजीकच्या विमा कंपनीचे प्रतिनिधी,
तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक
कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.
विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक व
तालुका व्यवस्थापक यांचे नाव व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. नमन वर्मा, जिल्हा
व्यवस्थापक (मो. 7024859665), साईप्रसाद उल्हारे, जिल्हा व्यवस्थापक (मो.7350413173),
रमेश भरकड, जिल्हा प्रतिनिधी (मो. 9289028840), दिपक बेतीवार, हिंगोली तालुका प्रतिनिधी
(मो. 9011114171), संतोष बकरे, कळमनुरी तालुका प्रतिनिधी (मो. 7709670967), आदित्य
भरकड, वसमत तालुका प्रतिनिधी (मो. 8483952962), पवन गायकवाड, औंढा नागनाथ तालुका प्रतिनिधी
(मो. 8308889773), दिलीप बोरहाडे, सेनगाव तालुका प्रतिनिधी (मो. 9011279939) असा आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असे आवाहन
करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment