हिंगोली परिषदेच्या 57 जागासाठी आरक्षण सोडत जाहीर
हिंगोली (जिमाका), दि.
28 : हिंगोली जिल्हा परिषद
सार्वत्रिक निवडणूक-2022 साठी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांच्या उपस्थितीत 57 जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर
उपस्थित होते.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या या 57 जागामध्ये अनुसूचित जातीसाठी 9
जागा यापैकी 05 जागा महिलासाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी 6 जागा असून
यापैकी 3 जागा महिलासाठी आरक्षित आहेत. नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी 13 जागा
आरक्षित असून यापैकी 7 जागा महिलासाठी आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 29 जागा असून
त्यापैकी 14 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तालुकानिहाय आरक्षणाचा तपशील
पुढीलप्रमाणे आहे.
हिंगोली तालुक्यातील 1-फाळेगाव अनुसूचित जमाती महिला, 2-आडगाव
सर्वसाधारण महिला, 3-खेर्डा सर्वसाधारण महिला, 4-पेडगाव अनुसूचित जाती महिला, 5-बासंबा
नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला, 6-बळसोंड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 7-भांडेगाव
अनुसूचित जाती, 8-उमरा अनुसूचित जाती महिला, 9-नर्सी नां. अनुसचित जमाती महिला, 10-डिग्रस
क. नागरिकाचा मागास प्रवर्ग , 11-माळधामणी नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला.
कळमनुरी तालुक्यातील 12-खरवड सर्वसाधारण महिला, 13-वाकोडी सर्वसाधारण
महिला, 14-येहळेगाव तु. सर्वसाधारण महिला, 15-कोंढूर अनुसूचित जमाती, 16-नांदापूर
अनुसूचित जाती महिला, 17-सिंदगी नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला, 18-पोत्रा
सर्वसाधारण महिला, 19-आखाडा बाळापूर नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला, 20-शेवाळा
सर्वसाधारण महिला, 21-वारंगा फाटा अनुसूचित जाती महिला, 22-जवळा पांचाळ नागरिकाचा
मागास प्रवर्ग, 23-डोंगरकडा
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.
सेनगाव तालुक्यातील 24-सवना अनुसूचित जमाती महिला, 25-गोरेगाव
सर्वसाधारण, 26-बाभुळगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग, 27-आजेगाव सर्वसाधारण महिला, 28-पानकनेरगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 29-जयपूर अनुसूचित जाती, 30- वरुड चक्रपान
अनुसूचित जाती, 31-साखरा नागरिकांचा मागास प्रवर्ग, 32-हत्ता सर्वसाधारण महिला,
33-भानखेडा अनुसूचित जमाती, 34-पुसेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग .
औंढा नागनाथ तालुक्यातील 35-येहळेगाव सोळुंके सर्वसाधारण, 36-पिंपळदरी
त. नांदापूर सर्वसाधारण, 37-जलालदाभा
सर्वसाधारण महिला, 38-दुधाळा अनुसूचित जमाती, 39-सिध्देश्वर सर्वसाधारण, 40-अंजनवाडी
सर्वसाधारण महिला, 41-उखळी सर्वसाधारण, 42-जवळा बाजार सर्वसाधारण, 43-पुरजळ अनुसूचित
जाती, 44-शिरड शहापूर सर्वसाधारण
महिला .
वसमत तालुक्यातील 45-पांग्रा शिंदे सर्वसाधारण, 46-पार्डी बु.
सर्वसाधारण, 47-कुरुंदा सर्वसाधारण, 48-गिरगाव सर्वसाधारण महिला, 49-कौठा
सर्वसाधारण, 50-आंबा सर्वसाधारण, 51-टेंभूर्णी नागरिकांचा मागास प्रवर्ग, 52-करंजाळा
अनुसूचित जाती महिला, 53-हट्टा सर्वसाधारण, 54-खांडेगाव सर्वसाधारण, 55-हयातनगर
सर्वसाधारण महिला . 56-बाभुळगाव सर्वसाधारण, 57-आसेगांव सर्वसाधारण .
*******
No comments:
Post a Comment