17 May, 2024

व्यवसाय प्रशिक्षणासाठी नोंदणीकृत संस्थांकडून 30 मेपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

हिंगोली (जिमाका), दि. 17 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) हिंगोलीमार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीमधील विद्यार्थी व विद्यार्थिंनींना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे व महामंडळाचा उद्देश सफल व्हावा, यासाठी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महामंडळामार्फत विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता कार्यक्रमांतर्गत शासनाच्या स्कील इंडिया अभियानांतर्गत नोंदणीकृत संस्थांकडून 30 मेपर्यंत प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत. हे प्रस्ताव जिल्हा कार्यालय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. यानंतर येणारे संस्थेचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांनी कळविले आहे. ******

No comments: