21 May, 2024

किर्गिस्तानमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा

हिंगोली (जिमाका), दि. 21 : किर्गिस्तानमधील पाकिस्तानी युवक आणि स्थानिक युवकांमध्ये वाद झाल्यानं हिंसाचार उफाळला आहे. भारतातून तसेच मुख्यतः महाराष्ट्रातून पाचशेहून अधिक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी किर्गिस्थानमध्ये असून त्यांना हिंसाचाराच्या फटका बसण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्याचा स्थानिक प्रशासनाचा निर्णय असून परीक्षेनंतर जूनमध्ये सर्व विद्यार्थी भारतात परतण्याचा अंदाज आहे. सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती आहे. हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी किर्गिस्थानमध्ये असतील तर त्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी भ्रमणध्वनी क्र. 9405408939 वर संपर्क साधावा. तसेच विद्यार्थ्यांबाबत काही अडचण असल्यास माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. *******

No comments: