29 May, 2024

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू विरोधी जनजागृती व तंबाखू मुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 29 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्य तंबाखू मुक्त करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालयामध्ये तसेच शासकीय कार्यालयामध्ये तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. यावर्षी 31 मे, 2024 रोजी जागतिक आरोग्य संस्थेने प्रस्थापित केलेली थीम "तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण" ही आहे. त्यानुसार जिल्हाभरात जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून दि. 31 मे, 2024 रोजी विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्व आरोग्य संस्था, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व शाळा, महाविद्यालये तसेच आपल्या अधिनस्त कार्यालयामध्ये तंबाखू विरोधी जनजागृती करावी व तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी केले आहे. *******

No comments: