29 May, 2024

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जागतिक आरोग्य संघटनेकडून ३१ मे हा जागतिक तंबाखू नकार दिवस म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर तर्फे महिनाभर विविध कार्यशाळा, स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. येथील जिल्हा रुग्णालयात दि. २८ मे रोजी विविध तंबाखू विरोधी पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्वाक्षरी मोहीम घेण्यात आल्या व विजेत्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले. या स्पर्धांच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आणि जिल्हा रुग्णालयातून तंबाखू विरोधी घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये अनेक अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांनी स्वाक्षऱ्या करून तंबाखूच्या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प केला. तसेच त्यानंतर उपस्थितांना तंबाखू विरोधी शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे, डॉ. माधवी घट्टे, डॉ. राजू नरवाडे, डॉ. मयूर पाठक, कविता भालेराव, वर्षा शेळके, कुलदीप कांबळे, कुलदीप केळकर, आनंद साळवे, मंगेश गायकवाड, प्रशांत गिरी, अर्चना पवार, येंगडे, अरबाज खान, अंकुश जगताप तसेच शासकीय नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. *******

No comments: