30 May, 2024

उन्हाळी शिबिरामध्ये बालगृहातील बालिकांना मार्गदर्शन

हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि मिरॅकल फाउंडेशन इंडियाच्या संयुक्त विद्यमाने येथील सरस्वती मुलींच्या निरीक्षणगृह व बालगृहात प्रवेशित बालिकांसाठी उज्वल इंग्लीश स्कूल हिंगोली येथे दिनांक 29 मे 2024 रोजी उन्हाळी शिबिराचेआयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बालगृहातील बालिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मानसशास्त्रज्ञ प्रमोद पडघान, बालकल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रमोद पडघान यांनी प्रथम देहबोली या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना देहबोली म्हणजे आपल्या मनात सुरू असलेल्या विचारांचा आरसाच असतो. एखाद्याच्या मनातले जाणून घेण्यासाठी त्याची देहबोली वाचायला शिकले पाहिजे, असे उदाहरणासहित स्पष्ट केले. बालकल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले यांनी बालिकांना जीवन जगत असताना त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या आलेल्या अडचणींना सामोरे जात असताना काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बालकांनी आपल्याला असलेले छंद जोपासत असताना त्याचा चांगल्या प्रकारे वापर कसा होईल हे पाहावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द व मेहनत असेल तर यश मिळवणे सोपे असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांनी उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून बालिकांना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे, असे सांगून उन्हाळी शिबिरातील बालिकांना तसेच इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व बालिकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बालकांसाठी उन्हाळी शिबिर का महत्त्वाचे आहे, उन्हाळी शिबिरामध्ये घेण्यात येणारे उपक्रम व कार्यक्रमाची रूपरेषा याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्त्या रेशमा पठाण यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी बालिकांच्या विविध कार्यक्रम घेण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी बालकल्याण समिती सदस्य परसराम हेंबाडे, किरण करडेकर, संगीता दुबे, सरस्वती मुलींचे निरीक्षण गृह व बालगृहातील शिक्षक शंकर घ्यार, काळजी वाहक वनिता पवार, संगीता भांदुर्गे, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण, अनिरुध्द घनसावंत, चाईल्ड लाइ्नचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, केसर वर्कर सुरज इंगळे इत्यादी उपस्थित होते. *******

No comments: