20 May, 2024

हट्टा येथील वेअर हाऊस व मशिनरी शेड बांधकामास स्मार्टच्या संचालकाची भेट

हिंगोली (जिमाका), दि. 20 : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प अंतर्गत वसमत तालुक्यातील हट्टा येथील हट्टावाला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वेअर हाऊस व मशिनरी शेडच्या बांधकामास पुणे येथील संचालक तथा स्मार्टचे प्रमुख अंमलबजावणी कक्ष दशरथ तांभाळे यांनी भेट देउन पाहणी केली. तसेच कंपनीच्या संचालकांना मशिनरी व इतर कामांच्या निविदेची तात्काळ कार्यवाही करुन इतर कामे पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक तथा स्मार्ट प्रकल्पाचे प्रमुख जिल्हा अंमलबजावणी कक्ष बी. आर. वाघ, स्मार्टचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ जी. एच. कच्छवे, जितेश नालट, वित्त प्रवेश सल्लागार व कंपनीचे संचालक झोयब सिद्दिकी यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. *******

No comments: