11 May, 2024

जलेश्वर तलाव सुशोभिकरण कामाशी संबंधित वाहनचालक व वाहन मालकांना नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जाहीर आवाहन

हिंगोली(जिमाका), दि.११ : येथील सर्वे न. 03/अ. मधील तलाबकट्टा जलेश्वर तलाव सुशोभिकरणाचे अनुषंगाने तलावाचे रुंदीकरण, खोलीकरण व गाळ काढण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनचालक, वाहनमालक व कामाशी संबधित सर्वांना तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, हिंगोली यांनी खालीलप्रमाणे जाहीर आवाहन केले आहेत. वाहनाची सर्व कागदपत्रे, विमा प्रमाणपत्र, प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र इत्यादी वैध असावेत. वाहन चालकाकडे चालवत असलेल्या संवर्गातील वाहनाची वैध अनुज्ञप्ती असावी. वाहन सुस्थितीत असावे. वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र वैध असावे. रहदारीतून वाहन चालवताना वाहनाचा वेग नियंत्रित असावा. दारु पिऊन किंवा कुठल्याही अमली पदार्थाच्या नशेत वाहन चालकाने वाहन चालवू नये. धोकादायक पध्दतीने वाहन चालवु नये. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करु नये. राँग साईडने वाहन चालवू नये. वाहनाचे सर्व लाईटस, हेडलाईट, टेल लाईट, ब्रेक लाईट, सर्व इंडिकेटर्स सुस्थितीत असणे आवश्यक आहे. क्षमतेपेक्षा जास्त भार ओवरलोड मालाची वाहतूक करु नये. अल्पवयनांनी वाहन चालवू नये. सायंकाळी 6 नंतर वाहतूक करु नये, असे आवाहन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. **********

No comments: