17 May, 2024

परिवहन विभागाच्या 'सारथी प्रणाली 4.0' चे तांत्रिक कामकाज लवकरच पूर्ण • जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 17 : नागरिकांना अनुज्ञप्ती (लायसन्स) व अनुज्ञप्तीविषयक इतर सर्व कामकाजासाठी परिवहन विभागाच्या सारथी 4.0 प्रणालीवर अर्ज सादर करणे व शासकीय शुल्क भरणे आवश्यक असते. परंतु दि. 18 मे, 2024 पर्यंत सारथी 4.0 प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचे देखभाल व दुरुस्तीचे काम राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत सुरु आहे. त्यामुळे परिवहन विभागाची संगणकीय सारथी 4.0 प्रणाली बंद आहे. त्यामुळे अर्जदारांना अर्ज व इतर कामे करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. सारथीच्या सर्व्हरचे तांत्रिक कामकाज लवकर पूर्ण होणार असून त्यानंतर अर्जदारांना या प्रणालीवरुन अर्ज करणे सुलभ होईल. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन परिवहन विभागास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे. ******

No comments: