15 May, 2024

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी सर्व राष्ट्रीय कार्यक्रमासह आरोग्य विभागाचा घेतला आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 15 : येथील सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा प्रशिक्षण संघामध्ये दि. 14 मे रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनिल देशमुख, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित बांगर यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांची आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने प्रौढ बीसीजी लसीकरण मोहीम सर्वेक्षण, सर्व राष्ट्रीय कार्यक्रमासह माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत नियमित लसीकरण, गरोदर मातांची नोंदणी व तपासण्या, प्रसूती त्याच बरोबर माता मृत्यू व बालमृत्यू बाबत सखोल आढावा घेतला. RCH पोर्टल वर नियमितपणें नोंदी करणे, Uwin ॲप, प्री रजिस्ट्रेशन, प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान शिबिर आयोजित करण्यात यावे. शिबिरात HIv, Hbsag सिकलसेल, GDM, BP, HB, Urine, थायरॉईड, VDRL, या तपासण्या करण्यात याव्या, आशा सूचना देण्यात आल्या. तसेच कुष्ठरोग कार्यक्रम, प्रधान मंत्री मातृत्व वंदना योजना, साथरोगाबाबत नियमितपणे पाणी नमुने, ब्लीचिंग पावडर नमुने, रक्त नमुने, कीटक शास्त्रीय सर्वेक्षण, सिकलसेल अशा विविध विषयावर सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच साथरोग उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या. यावर्षीचे घोषवाक्य "समुदायांच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा" हे असून दि. 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन सर्व आरोग्य संस्थेत साजरा करण्याच्या सूचनाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिल्या. यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. संदीप काळे, डॉ सावंत, डॉ. अनुराधा गोरे, डॉ. मेश्राम, अमोल कुलकर्णी, मुनाफ, नाना पारडकऱ, अझर अली. नरेश पत्की, बापु सूर्यवंशी, ज्योती बांगर आदी जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. ******

No comments: