31 July, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 05 रुग्ण

·       09 जणांना डिस्चार्ज; 161 रुग्णांवर उपचार सुरु

 

        हिंगोली, दि.31: जिल्ह्यात 05 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असून 09 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.

            नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एन.टी.सी. तापडीया ईस्टेट, हिंगोली येथील 03 व्यक्ती, काबरा जिनिंग जवळा पळशी रोड, हिंगोली येथील 01 व्यक्ती आणि बाराशिव ता. वसमत येथील 01 व्यक्ती असे एकुण 05 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे .

            तर बरे झालेले रुग्णांमध्ये आयसोलेशन वार्ड, सामान्य रुग्णालय,हिंगोली येथील 02 ,  कोरोना केअर सेंटर वसमत येथील 02 आणि कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथील 05 असे एकूण  09 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

            जिल्ह्यात कोविड-19 चे एकूण 598 रुग्ण झाले असून त्यापैकी 430 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 161 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 07 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.

 

****

 


30 July, 2020

कोरोना विषाणू नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना


·   नागरीक तथा लोकप्रतिनिधींनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

 हिंगोली,दि.30: जिल्ह्यात ग्रामीण भागात कोव्हिड-19 (कोरोना) विषाणूचे संसर्ग बाधीत रुग्ण आढळून येत आहे. याकरीता विविध यंत्रणाकडून होत असलेल्या कार्यवाहीची एकत्रित माहिती जिल्हास्तरीय कक्षाकडे मिळण्यासाठी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या आदेशान्वये जिल्हा नियंत्रण कक्षाची (कंट्रोल रुम) स्थापना करण्यात आली असून त्यासाठी पुढील प्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अ.क्र.

नाव

नियुक्ती

1

श्री. धनवंत माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

समन्वयक-जिल्हा नियंत्रण कक्ष

2

डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.हिंगोली

सदस्य

3

डॉ. गणेश जोगदंड, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग

सदस्य

4

श्री. यू.एल.हातमोडे, स.प्र.अ., सा.प्र.वि.

सहायक

5

श्री. राधेश्याम परांडकर, का.प्र.आ. पशुसंवर्धन विभाग

सहायक

6

श्री. सुनिल गुठ्ठे, क.प्र.अ. पंचायत विभाग

सहायक

7

श्री. अनिल केदार, विस्तार अधिकारी, सां.मबाक

सहायक

8

श्री. के.वाय.इशि, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विभाग

सहायक

कोरोना विषाणू जिल्हास्तरीय नियंत्रण सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद येथून करण्यात येणार आहे. कोरोना संबंधित अत्यावश्यक माहितीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षातील डॉ. गणेश जोगदंड, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग मो. 9822335273 यांच्याशी संपर्क साधावा. कोरोना विषाणूसंदर्भात सर्व आदेश, संचिका, माहिती एकत्रित करण्यात येणार असून रोजच्या रोज कोरोना विषाणूबाबतची माहिती वरिष्ठांच्या निर्देशनास आणून देण्यात येणार आहे.

सदर समितीतील अधिकारी/कर्मचारी साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात विविध यंत्रणासोबत समन्वय साधणार असून ग्रामीण भागातील नागरीक तथा लोकप्रतिनिधी यांना कोविड-19 च्या अनुषंगाने काही समस्या असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहान जिल्हा परिषादेचे अध्यक्ष गणाजी बेले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

****


महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थाकडून उज्वला योजनाकरीता प्रस्ताव मागणीस मुदतवाढ

 

हिंगोली,दि.30: अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र पुरस्कृत उज्वला योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या उज्वला योजना राबवू इच्छिणाऱ्या व उज्वला योजनेचा लाभ घेण्याकरीता संस्थाना दि. 25 जुलै, 2020 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु सदर प्रस्ताव मागविण्याच्या दिनांकात मुदतवाढ करण्यात आली असून प्रस्ताव मागविण्याची अंतिम दिनांक 24 ऑगस्ट, 2020 करण्यात आली असल्याचे महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्द पत्रकान्वये कळविले आहे.

त्यासाठी पुढील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत असावी. संस्थेमध्ये किमान महिलाकरीता सुविधा उपलब्ध असावी. संस्थेस अनैतिक व्यापारास प्रतिबंध करणे या विषयातील किमान पाच वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असावी. संस्थेचा वार्षिक ताळेबंद किमान वीस लाख रुपयांचा असावा. संस्थेच्या नांवे किमान 15 लक्ष इतकी रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणून असणे आवश्यक आहे. योजना राबविण्याकरिता इच्छूक संस्था त्याच जिल्ह्यातील असावी सदर संस्थेचे कायमस्वरुपी मुख्यालय किंवा शाखा कार्यालय त्याच जिल्ह्यात असणे आवश्यक आहे, संस्था निती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी. निती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी नसल्यास संस्थेचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, संस्थेकडे योजनेच्या निकषानुसार कर्मचारी वर्ग असावा. तसेच योजना राबविण्याचे निकष दि. 27 मार्च, 2018 मधील शासन निर्णयानुसार असावेत. फक्त प्रतिबंध किंवा सुटका हे घटक राबविणाऱ्या संस्थांना योजनेअंतर्गत मान्यता देण्यात येणार नाही. उज्वला योजनेच्या प्रस्तावासोबत द्यावयाच्या कागदपत्रांसाठी (प्रपत्र-ब) जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली कार्यालयास दि. 24 ऑगस्ट, 2020 पूर्वी संपर्क साधून कागदपत्रांसाठीची प्रपत्र-ब ची यादी प्राप्त करुन द्यावी. तसेच परिपूर्ण प्रस्ताव दि. 24 ऑगस्ट, 2020 पर्यंत सादर करावेत.

****


29 July, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 08 रुग्ण तर एकाचा मृत्यु

·       36 जणांना डिस्चार्ज; 165 रुग्णांवर उपचार सुरु

 

        हिंगोली, दि.29: जिल्ह्यात 08 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असून एका 50 वर्षीय रुग्णाचा कोविड-19 आजाराने मृत्यु झाला आहे.  तर 36 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.

            नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाईक नगर, हिंगोली येथील 01 व्यक्ती, वंजारवाडा हिंगोली येथील 01 व्यक्ती, तलाबकट्टा हिंगोली येथील 01 व्यक्ती, आझम कॉलनी हिंगोली येथील 01 व्यक्ती, रिसाला बाजार हिंगोली येथील 01 व्यक्ती,  एस.आर.पी.एफ. हिंगोली येथील 01 व्यक्ती, हिवरा ता. कळमनुरी येथील 01 व्यक्ती, शिवपुरी ता. वसमत येथील 01 व्यक्ती असे एकुण 08 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे .

            तर बरे झालेले रुग्णांमध्ये आयसोलेशन वार्ड, हिंगोली येथील 08 ,  कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथील 14 , कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथील 12 आणि कोरोना केअर सेंटर वसमत येथील 02  व्यक्ती  असे एकूण  36 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 593 रुग्ण झाले असून त्यापैकी 421 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 165 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 07 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.

 

****


28 July, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 10 रुग्ण तर 194 रुग्णांवर उपचार सुरु

 

        हिंगोली, दि.28: जिल्ह्यात 10 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असून 13 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.

            नव्याने आडळून आलेल्या रुग्णांमध्ये महादेववाडी, हिंगोली येथील 01 व्यक्ती, पेन्शनपुरा हिंगोली येथील 01 व्यक्ती, तोफखाना हिंगोली येथील 02 व्यक्ती, श्रीनगर हिंगोली येथील 01 व्यक्ती, यशवंत नगर आदर्श कॉलेज रोड हिंगोली येथील 01 व्यक्ती,  गाडीपुरा हिंगोली येथील 01 व्यक्ती, अष्टविनायक नगर हिंगोली येथील 01 व्यक्ती, सवड ता. हिंगोली येथील 01 व्यक्ती आणि मंगळवार पेठ वसमत येथील 01 व्यक्ती असे एकुण 10 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

            तर बरे झालेले रुग्णांमध्ये कोरोना केअर सेंटर सेनगांव येथील 05, कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथील 03 व कोरोना केअर सेंटर वसमत येथील 02, आणि जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमधील 03 व्यक्ती  असे एकूण  13  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 585 रुग्ण झाले असून त्यापैकी 385 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 194 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 6 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.

 

****


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन


        हिंगोली,दि.28: सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मातंग व तत्सम 12 पोट जातीतील विद्यार्थी/विद्यार्थींनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुण क्रमानुसार उपलब्ध निधीच्या अधिन राहुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते.

            शिष्यवृत्तीकरीता पात्र विद्यार्थी/विद्यार्थीनींकडून दि. 10 ऑगस्ट, 2020 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, मार्क लीस्ट, फोटो-02, आधार कार्ड तसेच पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतल्याचा पुरावा आदी आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

            तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या पुर्व बाजुस, दर्गा रोड, रिसाला बाजार, हिंगोली (संपर्क- 9822597838) यांच्याकडे आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक डि. एम. खडसे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

****

 


कोविड-19 चे जिल्ह्यात नवीन 17 रुग्ण तर 197 रुग्णांवर उपचार सुरु




        हिंगोली, दि.28: जिल्ह्यात 17 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असून 06 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.
            नव्याने आडळूण आलेल्या रुग्णांमध्ये गाडीपुरा, हिंगोली येथील 03 व्यक्ती, मेहराज कॉर्नर हिंगोली येथील 01 व्यक्ती, आझम कॉलनी हिंगोली येथील 1 व्यक्ती, मंगळवारा, हिंगोली येथील 03 व्यक्ती, एस.आर.पी.एफ. हिंगोली येथील 04 व्यक्ती, श्रीनगर  वसमत येथील 03 व्यक्ती, सोमवार पेठ, वसमत येथील 01  व्यक्ती आणि पठाण मोहल्ला वसमत येथील 01 व्यक्ती असे एकुण 17 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
            तर बरे झालेले रुग्णांमध्ये अंजनवाडी येथील 01, शुक्रवारपेठ वसमत येथील-04 व नारायण नगर हिंगोली येथील 01  असे एकूण 06 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 575 रुग्ण झाले असून त्यापैकी 372 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 197 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 6 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.

****

27 July, 2020

कारगील विजय दिनानिमित्त शहिदांना आभिवादन

 

हिंगोली,दि.27:  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कारगील विजयी दिनानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.   

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, माजी सैनिक केशव भडंगे, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील संजय केवटे, नामदेव मस्के यांच्यासह विविध विभागातील अधिकारी- कर्मचारी यांनी मौन पाळून शहिदांना श्रध्दांजली वाहिली.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी मार्गदर्शक नियमावली


·      बँक खाते धारकांना ऑनलाईन व्यवहार करण्याचे आवाहन

        हिंगोली,दि.27: जिल्ह्यातील बँकामध्ये विविध शासकीय योजनाचे तसेच वैयक्तिक कारणांसाठी रक्कम काढण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याकरीता जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूीवर व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनामार्फत मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात आली आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व बँकांची पैसे काढण्याची (Cash Withdrawal) सुविधा बंद करण्याबाबत दि. 22 जूलै, 2020 रोजी आदेश निर्गमित करण्यात आले होते. परंतु काही बँक व्यवस्थापक आणि APMC, मोठे उद्योग व मोठे व्यापारी वर्गामार्फत आलेल्या निवेदनानुसार बँकामध्ये संस्थात्मक पैसे काढण्याला (Cash Withdrawal) मुभा देण्यात आली होती.

            परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जन-धन खात्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून महिलांच्या खात्यात प्रत्येकी 500 रुपये जमा झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीची रक्कम जमा झाली आहे. तसेच पीक विमा आणि पीक कर्ज काढण्यासाठी किंवा इतर अर्थिक व्यवहारासाठी ग्रामीण व शहरी भागातील नागरिक बँक आणि एस.बी.आय ग्राहक सेवा केंद्रावर गर्दी करत असून याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे.            पैसे काढण्याची (Cash Withdrawal) सुविधा बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने खालीलप्रमाणे नियोजन केले असून यापूढे या नियमाचे पालन करुनच नागरिकांना बँकेतून पैसे काढता येणार आहे.

            ज्या क्षेत्रात तसेच गावांमध्ये बँकांचे Business Correspondent (BC) तसेच Customer Service Center (CSC) केंद्र आहेत अशा ठिकाणी Business Correspondent (BC) तसेच Customer Service Center (CSC) च्या माध्यमातून रक्कमेचे वाटप करण्यात यावे. या दरम्यान ग्राहक सेवा केंद्रात सामाजिक अंतर राखुन मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. ज्या क्षेत्रात किंवा गावात BC/CSC मार्फत रोख वाटप करणे शक्य नाही अशा ठिकाणी ग्रामसेवकामार्फत पुढीलप्रमाणे नियोजनाने रोख वितरण करण्यात येणार आहे. बँकांना जी गावे दत्तक देण्यात आली आहेत असे गावनिहाय रक्कम वाटप करण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात यावे. तसेच सदरचे वेळापत्रक पोलीस विभाग, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती तसेच संबंधीत ग्रामपंचायतीना कळवावे. ग्रामसेवक यांनी गावामध्ये ज्या नागरिकांना रोख रक्कम काढावयाची आहे अशा नागरिकांना पैसे काढण्याची (Withdrawal) स्लीप देऊन स्लीप भरून घ्यावी. ग्रामसेवक यांनी वेळापत्रकानुसार रक्कम वाटप करावयाच्या एक दिवस अगोदर Withdrawal स्लीप संबंधीत बँकांमध्ये जमा करावी. वेळापत्रकानुसार निश्चित केलेल्या गावात जातांना सोबत पोलीस विभागाचे पथक घेऊन जावे. रक्कम वाटप करतेवेळी पथकाने संबंधीत नागरिकाची ओळख पटण्यासाठी त्याचे आवश्यक कागदपत्रे/पुरावे याची तपासणी करून रक्कम वाटप करावी. निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार गावात जाण्याची तसेच रक्कम वाटप करते वेळी पोलीस विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी. रक्कम वाटप करते वेळी संबंधितांनी शासनाच्या नियमानुसार सामाजिक अंतर राखावे तसेच मास्कचा वापर व हातांची स्वच्छता करावी. यानुसार सदरील आदेशाची अंमलबजावणी दि. 27 जूलै, 2020 रोजीपासून करण्यात यावी. आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, सर्व बँकांचे व्यवस्थापक, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, Business Correspondent (BC) / Customer Service Center (CSC) केंद्रांचे समन्वयक तसेच व्यवस्थापक यांची असणार आहे. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यावर नियंत्रण ठेवणार आहेत.

            खातेधारकांनी जिल्हा प्रशासनाने वरील प्रमाणे ठरवुन दिलेल्या अंतराच्या निमयावलीचे तंतोतंत पालन करुन बॅंकेमध्ये व बॅंकेच्या परीसरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे (सामाजीक अंतर) पालन करावे. परंतू शक्यतो जिल्ह्यातील नागरिकांनी बँकेत किंवा एस.बी.आय ग्राहक सेवा केंद्रातून खात्यावरील पैसे काढण्याऐवजी ऑनलाईन किंवा ए.टी.एम.द्वारे आपले अर्थ‍िक व्यवहार करावे असे अवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

            सदर आदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल आणि संदर्भीय कायद्यानुसार संबंधितावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

 

****

 


कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनाचे पालन करुन बकरी ईद साजरी करावी - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 

        हिंगोली, दि.27: सद्यस्थितीत कोरोनाचा (कोवीड-19) प्रादूर्भाव अधिक प्रमाणात पसरत असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच काही जणांचा या संसर्गामुळे मृत्यू देखील झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897  दि. 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करुन त्याबाबतची नियमावली तयार केली आहे. तसेच शासनाने दि. 17 एप्रिल,2020 रोजीच्या आदेशान्वये एकत्रीत सुधारीत मार्गदर्शक सूचना देखील निर्गमीत केल्या आहेत.

            सद्या कोरोना संसर्गामुळे वाढत असलेल्या रुग्णाची संख्या लक्षात घेता मुस्लीम बांधवांचा बकरी ईद हा सण जवळ आला असून मुस्लीम बांधव दरवर्षी हा सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करतात. बकरी ईदच्या निमित्ताने मूस्लीम बांधव हे मोठ्या संख्येने मशीदमध्ये एकत्र येवून सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. परंतू सद्य परिस्थितीचा विचार करता एका ठिकाणी अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव होवून मोठ्या प्रमाणावर जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. याकरीता कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा करणे मूस्लीम बांधवाच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हिताचे नाही. त्याकरीता जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सर्व मुस्लीम धर्मीय नागरिकांना खालील मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे. या सूचनाचे पालन करुन आपण आपले व आपल्या कुटूंबाच्या आरोग्याचे रक्षण करत बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा.

            कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी बकरी ईदची नमाज मशीद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. तसेच कुर्बानीसाठी मुस्लीम बांधवांनी गर्दी करु नये. कोरोनाचा प्रादूर्भाव पसरु नये याकरीता प्रतिबंधीत क्षेत्रातील मुस्लीम बांधवांनी आपल्या नावांने ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून कुर्बानी करुन घ्यावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी एकत्र येवू नये. घराच्या/इमारतीच्या छतावर एकत्र येवून नमाज पठण करु नये. कोणत्याही सामाजिक, धार्मीक किंवा कौटूंबीक कार्यक्रमासाठी एकत्रित येवू नये.  तसेच महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडु नये, घराबाहेर पडतांना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखावे तसेच वेळोवेळी हात धुणे आदी नियमाचे पालन बकरी ईद सणाच्या दिवशी कटाक्षाने करावे. सर्व मूस्लीम बांधवांनी त्याच्या घरातच नमाज पठण आदी धार्मीक कार्य पार पाडावे. कोरोना (कोवीड-19) विषाणूचा प्रसार रोखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण सर्वांनी यासाठी सहकार्य केल्यास कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यास फार मोठी मदत होणार आहे.

            करोनाची साथ झपाट्याने वाढत असून जिल्हा प्रशासनाकडून ती रोखण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न आपण करीत आहोत. मागील 4 महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण नियमाचे पालन करुन मर्यादित प्रमाणात साजरे केले. त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने नियमांचे पालन करून साजरी व्हावी', अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद निमित्त शुभेच्छा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत.

****


जिल्ह्यात विक्रमी कापूस खरेदी - पालकमंत्री वर्षाताई गायकवाड


        हिंगोली, दि.27:  राज्यात कोविड-19 सारखी आपत्तीची परिस्थिती असतांना देखील पणन विभागामार्फत राज्यात विक्रमी सुमारे 219.49 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून हिंगोली जिल्ह्यातही मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी दूप्पटीने कापूस खरेदी झाली असल्याची पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

           राज्यात मागील 10 वर्षात झाली नाही अशी विक्रमी कापूस खरेदी झाली आहे. या खरेदीचे एकूण मुल्य 11, 776.89 कोटी रुपये असून आतापर्यात 11,0289.47 कोटी रक्कम शेतकऱ्यांना अदा देखील करण्यात आली आहे. तसेच सीसीआयने 30 सप्टेंबर, 2020 पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषीत केले आहे.

            हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या आपत्तीजन्य कालावधीत काही दिवस खरेदी बंद होती. परंतु नंतर खरेदी सुरू करण्यात आली व आगाऊ नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्यात आला.  जिल्ह्यात यावर्षी 1 हजार 804 शेतकरी बांधवांनी आपली नोंदणी केली होती. अद्यापपर्यंत जिल्ह्यात 17 हजार 960 शेतकरी बांधवांचा 4 लाख 20 हजार 852.55 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. यामध्ये कापूस पणन महासंघामार्फत 2 हजार 713 शेतकऱ्यांची 56 हजार 370 क्विटंल तर सी.सी.आय. मार्फत 9 हजार 826 शेतकऱ्यांची 2 लाख 67 हजार 870.45 क्विंटल, खाजगी बाजार मार्फत 2 हजार 367 शेतकऱ्यांची 49 हजार 742.10 क्विंटल तर बाजार समितीतील अनुज्ञाप्तीधारक व्यापाऱ्यामार्फत 3 हजार 055 शेतकऱ्यांची 46 हजार 870 क्विंटल अशी एकुण 17 हजार 960 शेतकरी बांधवांचा 4 लाख 20 हजार 852.55 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असल्याची माहिती उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनी दिली.

****


24 July, 2020

कोविड-19 चे जिल्ह्यात नवीन 54 रुग्ण · 167 रुग्णांवर उपचार सुरु

कोविड-19 चे जिल्ह्यात नवीन 54 रुग्ण

·         167 रुग्णांवर उपचार सुरु

 

        हिंगोली, दि.24: जिल्ह्यात 54 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.

            यामध्ये अँटीजन टेस्टद्वारे तोफखाना 12 व्यक्ती, मंगळवारा 10 व्यक्ती, तलाबकट्टा 4 व्यक्ती, आझम कॉलनी 12 व्यक्ती, पेंन्शनपुरा 5 व्यक्ती असे एकूण 43 जण तर इतर 11 व्यक्तींचा समावेश असून असे एकुण 54 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

            तसेच कोरोना केअर सेंटर, वसमत अंतर्गत 6 व जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथील 1 रुग्ण असे एकूण 7 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथे भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 13 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे.

            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 506 रुग्ण झाले असून त्यापैकी 334 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 167 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 5 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.

****

 


23 July, 2020

माजी सैनिक/विधवांच्या पाल्याना शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

माजी सैनिक/विधवांच्या पाल्याना शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

        हिंगोली, दि.23 : शासनाच्या सैनिक कल्याण विभागातंर्गत सन 2020 मध्ये इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी परीक्षेत किमान 60%  गुण प्राप्त करुन पुढील शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांच्या, विधवांच्या पाल्यांसाठी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती येाजना राबविण्यात येणार आहे. ज्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी इयत्ता 10वी, 12 वी, मध्ये 60%  गुण प्राप्त केले आहेत. त्यांनी आपले अर्ज दि. 15 ऑक्टोबर, 2020 पर्यंत‍ जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांच्याकडे कागदपत्रांसह सादर करावेत.

            यामध्ये इयत्ता 10 वी व 12 वी व पदवी गुणपत्रिकेची छायांकित प्रत, सद्या शिकत असलेल्या इयत्तेचे बोनाफाईड सर्टीफिकेट, केंद्र, राज्य शासनाची, इतर शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा शाळा, महाविद्यालयाचा, संस्थेचा प्राचार्यांचा दाखला, ज्या पाल्यांनी सीईटी/जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्षे 2019-20 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे अशा पाल्यांना प्रकरणासोबत गॅप सर्टीफिकेट (स्वयंघोषणापत्र) घेऊन शिष्यवृत्तीची मंजुरी द्यावी, माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तकात कुटूंबाची नांवे असलेल्या पानांची किंवा रॅशन कार्डची छायांकित प्रत, मुलीचे वय 18 पेक्षा जास्त असल्यास मुलगी अविवाहित असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला, आर्थिक मदतीच्या पिवळ्या कार्डची छायांकित प्रत (दोन्ही बाजू), राष्ट्रीयीकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्ड  इत्यादी कागदपत्र आपल्या अर्जासोबत जोडू अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

****

 


विविध क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन केलेल्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

विविध क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन केलेल्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांनी

विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

        हिंगोली, दि.23: जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन केलेल्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. यामध्ये  खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविणारे माजी सैनिक, पत्नी, पाल्य आणि शैक्षणिक वर्षे 2019-20 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डात 95%  पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापिठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व आयआयटी, आयआयएम व एम्स अशा नामवंत संस्थेमध्ये प्रवेश मिळविलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना सैनिक कल्याण विभागामार्फत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

            विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी पात्र असलेल्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असलेले कागदपत्रांसाठी दि. 16 सप्टेंबर, 2020 पूर्वी संपर्क साधावा. तसेच येतांना सोबत ओळखपत्राची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टीफिकेट, इयत्ता 10/12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, डिस्जार्च पुस्तकात कुटूंबाची नांवे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयीकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र इत्यादी आणावे.

            या विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

****


एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

एअर मार्शल व्ही.ए. पाटकर

विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

        हिंगोली, दि.23 : शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता 10 वी  व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक विधवांच्या पाल्यांकडून एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी अर्जाची मागणी करण्यात येत आहे. इच्छूकांनी आपले अर्ज दि. 16 सप्टेंबर, 2020 पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कक्षाकडे संपर्क साधावा. तसेच कार्यालयात येताना सोबत ओळखपत्राची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टीफिकेट, 10 वी / 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, डिस्जार्च पुस्तकात कुटूंबाची नांवे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयीकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत आणावी.

            जास्तीत-जास्त माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांनी केले आहे.

 

****

 

 


आता फक्त वैद्यकीय तसेच अपरिहार्य कारणांसाठीच ई-पास

आता फक्त वैद्यकीय तसेच अपरिहार्य कारणांसाठीच ई-पास

 

        हिंगोली, दि.23: जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून या अनुषंगाने उपाययोजना आवश्यक झाले आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात विनाकारण  ये-जा करण्यासाठी ई-पासची मागणी होत असून काही नागरिक विनाकारण इतर जिल्ह्यात ये-जा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता केवळ वैद्यकीय तसेच अपरिहार्य कारणांसाठी इतर जिल्ह्यात  ये-जा  करण्यासाठीच यापूढे ई-पास देण्यात येणार आहे. याशिवाय इतर कारणांसाठी नागरिकांनी ई-पासची मागणी करु नये. कारण आता जिल्हा प्रशासनाकडून अशा मागण्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

            वैद्यकीय कारणासाठी ई-पासची मागणीसाठी यापुढे आता केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, तालुका शासकीय रुग्णालय किंवा जिल्हा शासकीय, रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रच ग्राह्य धरण्यात येणार आहे. याशिवाय इतर कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.

            कोणत्याही व्यक्तीने या आदेशाची अवज्ञा केल्यास सबंधीतास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005, साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 आणि फौजदार प्रक्रिया संहिता 1973 नुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

****


जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन



            हिंगोली,दि.23: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, नायब तहसिलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
****