28 July, 2020

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन


        हिंगोली,दि.28: सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मातंग व तत्सम 12 पोट जातीतील विद्यार्थी/विद्यार्थींनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुण क्रमानुसार उपलब्ध निधीच्या अधिन राहुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते.

            शिष्यवृत्तीकरीता पात्र विद्यार्थी/विद्यार्थीनींकडून दि. 10 ऑगस्ट, 2020 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, मार्क लीस्ट, फोटो-02, आधार कार्ड तसेच पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतल्याचा पुरावा आदी आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

            तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या पुर्व बाजुस, दर्गा रोड, रिसाला बाजार, हिंगोली (संपर्क- 9822597838) यांच्याकडे आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक डि. एम. खडसे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

****

 


No comments: