03 July, 2020

जिल्ह्यात एक नवीन कोनाबाधीत रुग्ण ; तर 37 बाधित रुग्णांवर उपचार सुरु · जिल्ह्यात 02 रुग्णांना डिस्चार्ज.

जिल्ह्यात एक नवीन कोनाबाधीत रुग्ण ; तर 37 बाधित रुग्णांवर उपचार सुरु

·        जिल्ह्यात 02 रुग्णांना डिस्चार्ज.

हिंगोली,दि.3: जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार क्वारंटाईन सेंटर औंढा नागनाथ अंतर्गत एका 42 वर्षीय महिलेला कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरील महिला भोसी गावाची रहिवासी असून तीन कोविड-19 रुग्ण जे औंढा नागनाथ मध्ये भरती आहेत, त्यांच्या सोबत एकाच वाहनाने मुंबई मधून परतली आहे.

औंढा नागनाथ तालुका अंतर्गत भोसी गावातील गरोदर महिला जिल्हा कोविड-19 ची लागण झाली होती. तिच्या कुटुंबातील व गावातील सर्व 29 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

घोळवा गाव कळमनुरी तालुका अंतर्गत ज्या 71 वर्षीय पुरुषाचा दिनांक 28 जून, 2020 रोजी हैद्राबाद येथे मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबातील व गावातील जवळच्या संपर्कातील 32 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते, त्यातील 31 अहवाल निगेटिव्ह आले आहेत व 1 अहवाल रिजेक्ट आहे तो पुन:श्च  तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

आज रोजी कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथील 2 कोविड-19 बाल रुग्ण वय 2 वर्षे व 8 वर्षे रा. काजी मोहल्ला कळमनुरी हे बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यात कोविड-19 चे एकूण 277 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 240 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आज घडीला एकूण 37 रुग्णांवर उपचार चालू आहेत.

जिल्ह्यात विविध ठिकाणी भरती असलेल्या 37 रुग्ण पुढील प्रमाणे आहेत. यात कोरोना केअर सेंटर, वसमत मध्ये 03 कोविड-19 रुग्ण (1 चंदगव्हाण, 1 वसमत शहर, 1 बहिर्जी नगर) येथील रहिवासी आहेत. कोरोना केअर सेंटर कळमनुरी, येथे कोविड-19 चे एकूण 13 रुग्ण असून (4 काझी मोहल्ला कळमनुरी, 6 कवडा, 2 गुंडलवाडी, 1 बाभळी) येथील रहिवासी आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कळमनुरी येथे कोविड-19 चे 02  रुग्ण (1 एस.आर.पी. एफ, जवान, 1 भोसी औंढा नागनाथ) उपचारासाठी भरती आहेत. कोरोना केअर सेंटर, लिंबाळा येथे कोविड-19 चे 10 रुग्ण (2 तालाब कट्टा, 2 रिसाला बाजार, 2 केंद्रा बु., 01 प्रगती नगर हिंगोली, 02 भांडेगाव, 1 पिंपळखुटा) उपचारासाठी भरती आहे. तसेच कोरोना केअर सेंटर सेनगाव येथे 5 कोविड-19 चे रुग्ण (01 मन्नासपिंप्री, 01 ताकतोडा, 01 केंद्रा बु.,02 लिंगपिंप्री) उपचारासाठी भरती आहेत. तर क्वारंटाईन सेंटर, औंढा नागनाथ येथे 03 कोविड-19 रुग्ण (2 औंढा नागनाथ, 1 भोसी) उपचारासाठी भरती आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटर अंतर्गत एकूण 4 हजार 928 व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी 4 हजार 323 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह  आले आहेत. 4 हजार 242 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य:स्थितीला 678 व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी 367 अहवाल येणे / थ्रोट स्वॅब घेणे प्रलंबित आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घरीच थांबून मोलाचे सहकार्य करावे. सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधीत रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते.

000

 


No comments: