06 July, 2020

मौजे कवडा कंटेनमेंट झोन प्रतिबंध मुक्त


हिंगोली,दि.06: कळमनुरी तालुक्यातील मौजे कवडा येथे कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून मौजे कवडा गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतू मौजे कवडा या गावाचे दि. 23 जुन, 2020 रोजी सर्वेक्षण करण्यात आले असून एकूण 217 घरांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1017 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये संशयीत अथवा कोरोनाचे लक्षण असलेले (सर्दी, ताप व खोकला)  व्यक्ती आढळुन आले नसल्याने मौ. कवडा गाव कंटेनमेंट झोन मुक्त करणेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवालात सदर क्षेत्र प्रतिबंध मुक्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

त्यानुसार मौ. कवडा गावचा कंटेनमेंट झोनचा कालावधी संपला असल्याने सदर परिसरातील व्यक्तीसाठी प्रतिबंधीत करण्यात आलेले क्षेत्र प्रतिबंध मुक्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रतिबंधमुक्त करण्यात आल्याचे आदेश काढले आहेत.

****


No comments: