15 July, 2020

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी साधणार जनतेशी संवाद


        हिंगोली,दि.15: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

            जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्या ‘जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून नागरिकांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी शुक्रवार, दि. 17 जुलै, 2020 रोजी दुपारी 03.00 वाजता संवाद साधता येणार आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांकरीता जिल्हा प्रशासन काय करत आहे ?  येणाऱ्या कालावधीत नागरिकांनी कोणत्या निर्देशाचे पालन करावयाचे आहे, आपात्कालीन कालावधीत नागरिकांना कोणत्या माध्यमातून मदत मिळेल, याबरोबरच संवाद कार्यक्रमाच्या दरम्यान ‘जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली ’ या फेसबुक पेजच्या कंमेन्ट बॉक्स च्या माध्यमातून नागरिकांना आपल्या अडचणी, उपयुक्त सूचना, प्रश्न जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना विचारता येणार असून जिल्हाधिकारी या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना किंवा प्रश्न पाठवतांना आपले ठिकाण व तालुका आवर्जून नमूद करावा. हिंगोलीकरांनी या फेसबुक लाईव्ह संवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी  व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

*****


No comments: