हिंगोली,दि.09: माहे जुलै 2020 या महिन्याच्या मासिक वेतन
देयके दाखल करताना सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांचेकडे
आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहितीचे माहे जून 2020 अखेरचे ई आर 1 त्रैमासिक विवरणपत्र माहे 31 जुलै 2020
पर्यंत भरावयाचे आहे.
तसेच या
कार्यालयाचे संकेतस्थळ www.mahaswayam.in वरुन ऑनलाईन ई आर 1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे
प्रमाणपत्र देयकासोबत जोडल्याशिवाय मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके
स्विकारले जाणार नाहीत. सर्व कार्यालयांना या कार्यालयामार्फत युजर आय.डी. व
पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले ई-मेल आयडी, फोन
नंबर, पत्ता, टॅन नंबर, पॅन नंबर टाकून आपले प्रोफाईल अपडेट
करावी, असे सहायक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, हिंगोली यांनी
कळविले आहे .
*****
No comments:
Post a Comment