15 July, 2020

परिचर विनोदकुमार राठोड यांना रुजू होण्याचे आवाहन


          हिंगोली,दि.15: औंढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळा बाजार येथील परिचर, विनोदकुमार श्रीराम राठोड, हे कार्यालयात दि. 18 मे, 2018 पासून अनधिकृत अनुपस्थित असल्याने त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम, 1964 चे नियम 06 (02) नुसार दोषारोप प्रपत्र 01 ते 04 सह कारणे दाखवा नोटीस निर्गमित करण्यात आलेली होती. त्यांना बाजू मांडण्याची संधी देऊनही खुलासा सादर न केल्याने त्यांच्या विरुध्द विभागीय चौकशी आदेशीत करण्यात आली होती.

 विभागीय चौकशी अंती त्यांच्याविरुध्द ठेवण्यात आलेले सर्व दोषारोप सिध्द झाल्याने त्यांना पुनश्च : अंतिम संधी म्हणून महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम 1964 चे नियम 06 (10) नुसार जिल्हा परिषद सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये ? अशा आशयाची अंतिम कारणे दाखवा नोटीस निर्गमित करण्यात आलेली होती. मात्र तरीही त्यांनी खुलासा सादर केलेला नाही. तसेच पंचनामा दरम्यान ते दिलेल्या पत्यावर आढळून आले नाहीत.

            यामुळे  विनोदकुमार श्रीराम राठोड, परिचर , प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळा बा. ता. औंढा यांना अंतिम संधी देण्यात येत असून त्यांना कळविण्यात येते की, आपण आठ दिवसांमध्ये सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली  या कार्यालयाशी संपर्क करावा अन्यथा आपणास जिल्हा परिषद सेवेची आवश्यकता नाही असे समजून जिल्हा परिषद सेवेतून बडतर्फ करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी केले आहे.

*****


No comments: